
👉🏻हदगाव- हिमायतनगर तालुक्यातून शेकडो लाडक्या बहिणी भावाच्या भेटीला हिमायतनगर दाखल…आज दुपारी 3 वाजता जाहीर सभा..
हिमायतनगर प्रतिनिधी/-हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव पाटील कोहळीकर यांच्या प्रचारार्थ हिमायतनगर येथे बस स्थानक मैदानावर आज नऊ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे तरी या सभेला हदगाव हिमायतनगर तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान बाबुराव पाटील कोहळीकर यांनी केले आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री हे लाडक्या बहिणीच्या भेटीला येत असल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील शेकडो लाडक्या बहिणी लाडक्या भावाच्या भेटीला हिमायतनगरात येणार असल्याचे लाडक्या बहिणीने सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी विविध योजना राबविल्या असून महिला वर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. म्हणून हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातून लाडक्या बहिणींनी राखी पौर्णिमेला राख्या पाठवल्या होत्या पण स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिमायतनगर मतदारसंघांमध्ये येत असल्यामुळे स्वतः भेटण्यासाठी जाणार आहेत त्याचबरोबर मतदारसंघातील सर्व शिवसैनिक सुद्धा या जाहीर सभेला येणार आहेत त्यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचार सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान उमेदवार बाबुराव पाटील कोहळीकर यांनी केले आहे.