मुदखेड दि.२२: कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडावरील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली विशालगडा पासून काही अंतरावर असलेल्या गजापूर येथील मुस्लिम समाजावर एकत्रितपणे हल्ला करून मुस्लिम धर्मियांची पवित्र ग्रंथ कुराणची नासधूस करत आणि मशिदीची विटंबना करुण निष्पाप मुस्लीम बांधवाना मारहाण केले गेले या घटनेचा मुदखेड तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीन निषेध करत आज दिनांक 22 जुलै कथित गूड प्रवृत्तीच्या समजाकंटकावर कार्यवाहीसाठी तहसीलदार यांचे प्रतिनिधी म्हणून नायब तहीसलदार मारोतराव जगताप यांनी निवेदन शिष्ट मंडळाकडून निवेदन स्वीकारून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना सदरचे भावना कळवू असे या वेळी सांगितले.
नांदेड जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे खासदार यांचे प्रतिनिधी रवींद्र ऊर्फ बंडू पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील गाढे,तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रतापराव देशमुख, शहर काँग्रेस अध्यक्ष कैलास अण्णा गोडसे,माजी नगराध्यक्ष राजाप्पा कोत्तावार, माजी उपाध्यक्ष करीम खाँ साब, माजी उपाध्यक्ष लक्ष्मण देवेदे, तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष मोहम्मद गौस,शहर उपाध्यक्ष सूर्यकांत चौंदते,शहर सचिव अतिक अहेमद ,शहर युवक अध्यक्ष मुजीब पठाण,प्रशांत पाटील कवळे,मोहम्मद युसुफ सेठ,अविनाश चौंदते, संपादक हाजी मोहम्मद अझगर हुसैन,आकाश सोनटक्के, , गजानन संबोड, ज्येष्ठ नागरिक शेख मोहीयोद्दिन , श्रीनिवास महादवाड, साहेबराव देशमुख,मोईन भाई फुलारी,लतिफ टेलर,फारूख बागवान,
साहेबराव मेटकर,तिरुपती पवार,गजानन कल्याने,पत्रकार हफीझ कुरेशी,खदिर भाई ऑटोवॉले, खदिर टेलर आदी सह मोठ्या संख्येने यावेळी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड
