नांदेड, दि.१८ (प्रतिनिधी)-ओळखीचे पुरावे असतानाही परिक्षेला बसू न दिल्याची तक्रार अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठी परीक्षा देणार्या उमेदवारांनी एका निवेदनाव्दारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
दि.१७ जुलै रोजी सहयोग कॅम्पस येथे अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठी परीक्षा घेण्यात आली. दरम्यान परिक्षेसाठी आलेल्या काही महिला उमेदवारांकडे आधारकार्ड, पॅनकार्ड आदी ओळखीचे पुरावे असतानाही पॅनकार्डवर पतीचे नाव वर आणि वडिलांचे नाव खाली असल्याच्या कारणावरुन परिक्षेत बसू देण्यात आले नाही. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करुन अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठी पुन्हा परीक्षा घ्यावी, अशी मागणी परिक्षेसाठी आलेल्या महिला उमेदवारांनी एका निवेदनाव्दारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. निवेदनावर सुकेशना पवार, सोनल आडावे, अनिता गंगलवाड, सविता कोल्हे, सरिता मंगलपल्ली, अर्चना जोंधळे, मनिषा बागाने, साधना कदम यांच्या स्वाक्षर्या आहेत.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड
