नांदेड दि.२४ : शासन परिपत्रकातनुसार इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरविण्यात यावे अशी मागणी पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
शासनाने दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी नऊ नंतर भरविण्याचे आदेश दिले होते. हे आदेश शैक्षणिक वर्ष 2024 -25 पासून लागू झाले आहेत. विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होईल ते उत्साही वातावरणात शिक्षण घेऊ शकतील हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासन परिपत्रक काढण्यात आले. परंतु जिल्ह्यातील अनेक शाळांनी या परिपत्रकाला बगल दिली असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील शाळा 15 जून पासून सुरू झाल्या असून आठवडा लोटला असला तरी शाळांनी वेळेत बदल केला नाही. ही बाब गंभीर असून शिक्षण विभागाने परिपत्रकाचीची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळावर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. निवेदनाच्या प्रती राज्यपाल, शिक्षण मंत्री, उपसचिव तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड














**mitolyn**
Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.