उमरखेड: तालुक्यातील मौजे बोरी (चा.) येथील प्रतिष्ठित नागरीक कै.तुकाराम भागाजी गाडगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ॲड.मंगेश गाडगे यांच्या तर्फे दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा बोरी (चा.) येथील अभ्यासाबरोबरच इतर कला गुणांमध्ये निपुण असणाऱ्या शाळेतील अव्वल २ विद्यार्थ्यांना दिला जाणारा “डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श विद्यार्थी पुरस्कार-२०२६” अनिकेत गौतम रोकडे इयत्ता ७ वी चा विद्यार्थी याला तर “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्श विद्यार्थीनी पुरस्कार -२०२६- वैष्णवी अमोल माने इयत्ता ४ थी ची विद्यार्थीनी हिला श्री. प्रकाश तुकाराम गाडगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
या पुरस्कारासाठी विद्यार्थ्यांची निवड शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा, संगीत, नेतृत्वगुण, वक्तृत्व, लेखन, अवांतर वाचन अशा विविध निकषांना केंद्रस्थानी ठेवून करत असतात.
या पुरस्काराद्वारे विद्यार्थ्यांना आकर्षक शालेय साहित्य संच वितरित करुन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना प्रोत्साहन दिले जाते. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये सर्वच क्षेत्रात सकारात्मक स्पर्धा लागते व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते असे मत मुख्याध्यापक श्री. कैलास कोंडरवाड नोंदवले आहे.