छत्रपती संभाजीनगर दि.६ फेब्रुवारी : छत्रपती संभाजीनगर विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त श्री. जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते नगरसेवक श्री. गणेश कौतिकराव लोखंडे यांची छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेतेपदी शुक्रवार, 6 फेब्रुवारी रोजी एकमताने निवड करण्यात आली. यासंदर्भातील विभागीय आयुक्त यांच्याकडे अधिकृत कागदपत्रे सादर करण्यात आली.
एकनिष्ठ व जबाबदारीने कार्य करणारे नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या श्री. लोखंडे यांनी आजवर पक्षाने सोपविलेल्या सर्व जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या पुढील कार्यासाठी शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, दिग्विजय शेरखाने, ज्ञानेश्वर डांगे, नगरसेवक राशीद मामू, सावित्रीबाई वाणी, सचिन खैरे, सुनिताताई सोनवणे, वैशाली कोरडे, हनुमान शिंदे व रामेश्वर कोरडे उपस्थित होते.













