तुषार कांबळे : हदगाव / नांदेड
हदगाव तालुक्यातील मौजे शिबदरा येथील श्री क्षेत्र अडिचलिंगेश्वर महादेव मंदिर पुरातन हेमाडपंथी असून येथे दरवर्षी महाशिवरात्रीला भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येत असते, दिनांक 15 ते 18 तारखेपर्यंत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, या यात्रेमध्ये शालेय लेझीम स्पर्धा व जंगीशंकर पटाचे हे आयोजन करण्यात आले आहे तर दि 15/2/2026 रोज रविवार सकाळी सहा वाजता गावातील मानकर यांच्या हस्ते श्रीचा अभिषेक होईल सकाळी आठ ते नऊ शिवलीला मृत ग्रंथाचे पारायण होईल ,कलश पालखी शोभायात्रा नगरप्रदक्षिना सकाळी 11 ते 12 108 वेदाचार्य श्री दिगंबर शिवाचार्य स्वामी महाराज थोरला मठ वसमत यांचे प्रवचन व लगेच दुपारी दोन ते चार सामुदायिक गावकऱ्यांचा अभिषेक व रात्री जागराचे भजन संगीत भजनी मंडळ सिबदरा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक 16/ 2 2026 रोज सोमवारला शालेय लेझीम स्पर्धा सकाळी दहा वाजता 17 व 18 रोज मंगळवार बुधवार दोन दिवसीय भव्य शंकर पट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे,
या यात्रेला नांदेड हिंगोली परभणी यवतमाळ जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात,
## सत्यप्रभा न्यूज नांदेड ##













