• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, May 23, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

विकसीत भारतासाठी दुर्गम भागातील आदिवासींच्या विकासावर शासनाचा प्रामुख्याने भर- पालकमंत्री गिरीश महाजन 

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
16 November 2023
in Top News, किनवट, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image1374929962 1700146987007
32
SHARES
213
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.१६: आजवर जे वंचित घटक विकासाच्या प्रवाहात येऊ शकले नाहीत, अशा दुर्गम आदिवासी भागातील लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यावर आपण भर देत आहोत. प्रत्येक व्यक्तींच्या गरजेनुसार ज्या योजना त्यांना योग्य असतील अशा योजना साकारलेल्या आहेत. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यंत, स्वयंरोजगारापासून कृषी पर्यंत विविध योजनांचा समावेश आहे. या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी आहे. शासकीय योजनाप्रती सकारात्मकता ठेऊन त्या-त्या योजनांचा लाभ घेतल्यास भारताला विकसीत देशाच्या क्रमवारीत येण्याला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

“विकसीत भारत संकल्प यात्रे”च्या किनवट येथील शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार भिमराव केराम, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, गोकुंदा येथील सरपंच अनुसया सिडाम, सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, सुधाकर भोयर व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आदिवासी समाज हा राना-वनात राहणारा आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात आदिवासी समाजानेही मोठे योगदान दिले आहे. भगवान बिरसा मुंडा, तंट्ट्या भिल्ल, तेलंगा ख‍डीया, वीर नारायण सिंह, जत्रा भगत, अल्लूरी राजू, बुधू भगत या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी आपले योगदान दिले आहे. जल, जमीन, जंगल यांच्या रक्षणासाठी आदिवासी बांधवांनी मोठी भूमिका पार पाडली आहे. आदिवासींच्या विकासासाठी विविध विकास योजना प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज आहे. या यात्रेतून दुर्गम भागातील प्रत्येक गावात ज्या आदिवासींना आजवर कोणत्या योजना मिळाल्या नाहीत अशा लाभार्थ्यांची निवड करून त्यांना त्या-त्या योजनांचा लाभ देण्याच्या कामास निश्चित गती मिळेल, असा विश्वास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून “विकसीत भारत संकल्प यात्रा” होत असून केंद्र सरकार, राज्य सरकार यासाठी कटिबद्ध होऊन काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. उज्ज्वला सारखी योजना, आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपण देवू शकलो, असे ते म्हणाले. प्रत्येक वाड्या-पाड्यांवर आदिवासी वस्तींवर शुद्ध नळाचे पाणी पोहोचले पाहिजे यासाठी “हर घर नल से जल” ही योजना त्यांच्याच दूरदृष्टीतून साकारली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 50 लाखांपेक्षा अधिक आदिवासींना लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सुमारे 1 कोटी 50 लाखांपेक्षा अधिक कुटुंबियांना शासन शौचालय देवू शकले. शासकीय योजनांद्वारे झालेले हे मोठे परिवर्तन आहे, असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

यावेळी आमदार भिमराव केराम, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या देशव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी झारखंड राज्यातून दूरदृष्यप्रणालीद्वारे केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

#सत्यप्रभा न्यूज #नांदेड

Previous Post

हिमायतनगर शहरातील पवनसुत ऑटोमोबाईल होलसेल आणि रिटेल चा भव्य शुभारंभ थाटात संपन्न…

Next Post

आधुनिक युगात सखोल पक्षी संशोधनाची गरज : पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे

Next Post
image editor output image 988084678 1700239328946

आधुनिक युगात सखोल पक्षी संशोधनाची गरज : पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • बॉक्स ऑफिसवर देऊळ बंद २ चा धमाका ! प्रवीण तरडे यांच्या चित्रपटाची पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई
दहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या देऊळ बंद २ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रवीण तरडे यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे दणदणीत सुरुवात केली असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटसृष्टीत नेहमी शुक्रवारच्या मुहूर्तावर नवनवीन चित्रपट प्रदर्शित करण्याची पद्धत आहे. मात्र या परंपरेला फाटा देत गुरुवारी २१ मे रोजी पहाटे साडेपाच वाजता म्हणजेच ब्राह्ममुहूर्तावर या चित्रपटाचे शोज सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे या भल्या पहाटेच्या शोजलाही सर्व सिनेमागृहे खचाखच भरलेली पाहायला मिळाली.
सध्या भारत भरात या चित्रपटाचे ५०० सिनेमागृहांमध्ये तब्बल दोन हजारांहून अधिक शोज अत्यंत यशस्वीरीत्य�
  • फडणवीसांची गँगच जर अशा पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढत असेल, तर बिचाऱ्या पोलिसांना दोष देऊन काय उपयोग? फडणवीस हे अंशकालीन गृहमंत्री आणि पूर्णकालीन नेहरू-गांधी-ठाकरे विरोधक म्हणूनच इतिहासात नोंदवले जातील.
.
#SushmaAndhare #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #BreakingNews #SatyaprabhaNews
  • साली डरपोक जनता पार्टी ! BJP नाव बदला आणि DJP करा. लाज वाटायला पाहिजे साल्याहो. तुम्हाला तुमचं चानेल ग्रोव करायला 14 वर्षे लागले. जवान पोट्यांनी चार दिवसात करून दाखवलं. : नितेश कराळे प्रवक्ते राष्ट्रवादी श.प.
.
#niteshkarale #cokroachjantapart #BreakingNews #SatyaprabhaNews #MarathiNews
  • मनोज जरांगे आता डीलपती झाले आहेत, असं माझं सरळ म्हणणे आहे.. - लक्ष्मण हाके , ओबीसी आरक्षण आंदोलक
.
#laxmanhake #manojjarangepatil #SatyaprabhaNews #maharashtra #MarathiNews
  • कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून तरुणांच्या मनातील भडास व्यक्त केली जातेय.आज प्रत्येक माणूस उठतोय आणि कॉकरोच जनता पार्टीचा सदस्य म्हणतोय, सोशल मीडियाला टाकतोय.एका क्लिकवर जग एकत्र आलेलं आहे, त्यामुळं सत्ताधाऱ्यांनो तुम्हाला घरी बसवायला नवीन पिढी, Gen-Z मागं पुढं बघणार नाही. त्यामुळं सावध असा नाहीतर तुमचा कार्यक्रम करेक्ट होईल.
-लक्ष्मण हाके(ओबीसी आरक्षण आंदोलक)
.
#laxmanhake  #cockroachjantaparty  #IndianPolitics  #MarathiNews #SatyaprabhaNews
  • इटलीमध्ये जाऊन तिथल्या महिला राष्ट्राध्यक्षांना चॉकलेटची भेट देणं कितपत योग्य आहे? पंतप्रधानांचे हे वर्तन हास्यास्पद आहे.
.
#NanaPatole #SatyaprabhaNews #NarendraModi #BreakingNews #MarathiNews
  • नीट पेपरफुटी प्रकरणी डॉ. मनोज शिरुरेला सीबीआयकडून अटक; मोटेगावकरकडून स्वत:च्या मुलासाठी खरेदी केलेला पेपर
.
#manojshirure  #neetexam  #maharashtra  #MarathiNews #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10439
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8176
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6327
Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026

Recent News

Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज