


महाविकास आघाडी कडून मतांची जुळवाजूळव सुरू….
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /-हदगाव हिमायतनगर ही विधानसभा पारंपारिक मतदार संघ असल्यामुळे या मतदारसंघात घराणेशाहीचा वारसा मागील 25 ते 30 वर्षापासून चालत आलेला आहे यावेळेसचे चित्र मात्र थोडे वेगळे असल्याचे पाहायला मिळत आहे महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्याची हिमायतनगर शहरात जाहीर सभा आयोजित केली होती त्या सभेमुळे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांचे पारडे जड झाले झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार आरोप प्रत्यारोप करून हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील प्रचार गावोगावी जाऊन,ठीक ठिकाणी बैठका संवाद व मतदारांच्या गाठीभेटी करण्यावर जाऊन ठेपला आहे त्यातच दुसऱ्या पक्षातील गाव पुढारी कार्यकर्ते यांना आपल्याकडे वळविण्यासाठी महाविकास आघाडी करून मोठे प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे अनेकांनी आपल्या आगामी राजकीय सोयीसाठी एन वेळी पक्ष बदलण्याचा सपाटा सध्या मतदारसंघात लावला आहे आपली राजकीय पकड मतदार संघावर मजबूत करण्यासाठी उमेदवाराकडून मतांच्या जुळवाजुळविचे गणित ते करत असल्याचे चित्र दिसून येत आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे की हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये नेहमीच चुरशीची लढत पाहायला मिळते या मतदारसंघात यावेळेसची लढत अतिशय रंगतदार होणार असल्याचे संकेत आहेत 2019 मधील लढकी पेक्षा यंदाची निवडणूक काही पुढाऱ्यांच्या राजकीय अस्तित्वाची ठरणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर व महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या कडून हदगाव हिमायतनगर विधानसभेवर विजयी होण्यासाठी कोणतीही कसर ठेवली जात नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत दुसऱ्या पक्षातील असंतुष्ट कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न उमेदवारा कडून प्रयत्न सुरू आहेत त्याला महायुतीच्या उमेदवाराला मात्र प्रचंड प्रतिसाद सुद्धा मिळत आहे निवडणूक रिंगणातील माजी खासदार सुभाष वानखेडे,विकास पाटील देवसरकर,विलास वानखेडे,राम नरवाडे ,सावन डाके यांच्या प्रवेशाने महायुतीच्या उमेदवारांचे समर्थन हिमायतनगरात वाढले आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून शहरात नवीन विशेष मोहीम राबविली जात आहे ही निवडणूक सोपी जाण्यासाठी करत असलेले प्रयत्न आपल्याला फळाला येतील अशी राजकीय धारणा असल्याने हा सर्व खटाटोप हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात केला जात असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे महायुतीच्या उमेदवारासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या.सह त्यांचे कार्यकर्ते मतदारसंघात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे महायुतीच्या उमेदवारासाठी भाजपाकडून गल्ली बोळात प्रचार रॅल्या काढून ठीक ठिकाणी कॉर्नर बैठका घेऊन मतदारांचे मत परिवर्तन करण्याचे काम भारतीय जनता पार्टी कडून होत आहे त्यामुळे आरोप प्रत्या रोपाने गाजते हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीचे मैदान यामध्ये कोण बाजी मारणार हे मात्र अद्याप तरी कळेनासे झाले आहे त्यामुळे ही निवडणूक दुरंगी होणार की चौरंगी होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे….