वाळू घाटावर जाऊन लाभार्थ्यांना केले पाच ब्रास मोफत रेतीचे वाटप
नांदेड दि.२७: तालुक्यातील एकही रेतीघाटाचा लिलाव न झाल्याने घरकुल लाभार्थ्यांना रेतीची मोठी समस्या निर्माण झाली होती. याबाबत नागरिकांनी शासनस्तरावर अनेक निवेदने देण्यात आले होते. अखेर शासनस्तरा वरून तालुक्यातील पात्र घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास मोफत रेतीचे आदेश देण्यात आले त्यानुसार आज हिमायतनगर येथील तहसीलदार पल्लवी टेमकर मॅडम यांनी दि २७ मे ला मौजे सरसम बु. येथील म्हसोबा नाला येथील पात्र घरकुल लाभार्थ्यांचा सत्कार करून त्यांना ५ ब्रास मोफत रेती योजनेच्या शुभारंभ प्रसंगी त्यांचा सन्मान करून त्यांना ठरवून दिलेल्या रेती घाटातून रेती उपलब्ध करून देण्याचे काम सुरु केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शासन निर्णयाप्रमाणे निश्चित केलेल्या वाळू घाटातून तालुक्यातील पात्र घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत रेती उपलब्ध करून देण्याची मोहीम शासनाने घेतली त्या मोहिमेचा शुभारंभ आज दिनांक २७ मे रोजी हिमायतनगरच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला शासनाच्या नव्या वाळू धोरणानुसार तालुक्यातील पात्र घरकुल लाभार्थ्यांच्या बांधकामासाठी लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याची घोषणा शासनाने केली होती मात्र शासन निर्णय पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपल्यावरही अंमलात आला नव्हता त्यामुळे तालुक्यातील असंख्य घरकुल लाभार्थ्यांना रेती अभावी घरकुल बांधकाम करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध होत नसल्याने मोफत वाळू धोरणाची अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांना पडताच शासनाच्या निर्णयाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून हिमायतनगर तालुक्यातील असंख्य घाटावर जाऊन हिमायतनगरच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी आज दिनांक २७ मे रोजी शासन निर्णयाप्रमाणे निश्चित केलेल्या वाळू घाटावरून पात्र घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून देण्याची मोहीम आज मोजे सरसम बु येथील एका पात्र घरकुल लाभार्थ्यांचा सन्मान करून ही मोहीम सुरू केली या मोहिमेचा जास्तीत जास्त तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान सुद्धा महसूल प्रशासनाने केले आहे यावेळी मोजे खडकीचे सरपंच प्रतिनिधी संजय सूर्यवंशी , गद्दमवार सर, हरिष गिरी, योगेश अलेवाड,अनिल पवार देविदास पाटील, पत्रकार पांडुरंग गाडगे, अर्जुन गड्डमवार , सिद्धोधन हनवते सह आदी घरकुल लाभार्थी उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड