श्रीराम नवमीनिमित्ताने रक्तदान शिबीर संपन्न : अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन
नांदेड दि.७:येथील मगनपुरा भागातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. सदिच्छा सोनी पाटील व मातोश्री प्रतिष्ठाण च्या वतीने श्रीराम नवमी निमित्ताने आनंदनगर येथे रविवार. दि.६ एप्रिल रोजी आयोजित रक्तदान शिबीर व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथ खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांच्यासमवेत खा.डॉ. अजित गोपछडे, भाजपाचे महामंत्री संजय कौडगे, जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे , माजी महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण साले , माजी स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, डॉ.सचिन उमरेकर यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी आयोजित रक्तदान शिबीराचा शुभारंभ खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर त्यांनी प्रभू श्रीरामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर सौ.सदिच्छा सोनी पाटील यांच्या सामाजिक कार्याची माहीती घेऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच््छा दिल्या तसेच सदरील रक्तदान शिबीरात २०० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून ऐन उन्हाळ्यात रक्तदान शिबीरास उदंड प्रतिसाद देत शिबीर यशस्वीपणे पार पाडले
महारक्तदान शिबिर व महाप्रसाद वाटप कार्यक्रमास मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान पाटील नेव्हल, तानाजी पाटील, यांचे विशेष सहकार्य लाभले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मगनपुरा मित्रमंडळाचे नितीन इंगळे पाटील, गजानन कर्ले, भास्कर पाटील शिंदे,रमेश वानखेडे, शक्तीसिंह ठाकूर, विशाल राऊतखेडकर, विशाल कंधारे, दिपक स्वामी, रवि गारोळे, किशोर बोंढारे स.जसपालसिंग कोल्हापुरे , प्रशांत अंकराला, आशुतोष जोशी , डॉ.नागेश कल्याणकर , डॉ.कुमार निवळीकर यांच्यासह वसंतनगर,बाबानगर,शाहूनगर प्रभागातील युवकांनी परिश्रम घेतले
सामाजिक जाणिवेतून महारक्तदान शिबीराचे आयोजन ..सौ. सोनी
उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि तापमानामुळे लोक रक्तदान करण्यासाठी कमी प्रमाणात पुढे येतात, ज्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी होतो , रक्ताचा तुटवडा झाल्यास, रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होत नाही, ज्यामुळे त्यांच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो एंकदरीत उन्हाळ्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेत एक सामाजिक जाणिवेतून आपण श्रीराम नवमीच्या प्रसंगी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबीरात २०० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबीर यशस्वी पणे पार पाडले याबद्दल सर्व रक्तदात्यांचे आभार सौ.सदिच्छा सोनी पाटील यांनी शेवटी व्यक्त केले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड