तुषार कांबळे | हदगाव | नांदेड प्रतिनिधी | नांदेड शहरातील गुजराती कॉलनी छत्रपती चौकाजवळ प्लॉट क्र.26 येथे बिल्डरने आपले हित साधत साई अपार्टमेंट नावाने पाच मजली अपार्टमेंटचे बांधकाम नियम मोडीत काढून केले.बांधकाम करताना नियमानुसार करणे आवश्यक असताना नियमबाह्य बांधकामाने वसाहतीसह विकत घेणा-याचेही नुकसान झाले. साई अपार्टमेंट बद्दल कॉलनीतील नागरिकांनी महानगरपालिकेडे तक्रारी व लिगल नोटीस देवून देखील काहीच कारवाई झाली नाही.
साई अपार्टमेंटवर कारवाई न झाल्याने बिल्डरची हिम्मत वाढली व त्याच बिल्डरने याच कॉलनीत प्लॉट क्रमांक ०८ वर तसेच सहा मजली अपार्टमेंटचे बांधकाम सुरू केले.परंतु सुरुवातीपासूनच कॉलनीतील नागरिकांनी महानगरपालिकेडे तक्रारी केल्या परंतु कारवाई होत नसल्याने कॉलनी वासियातर्फे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.मा.न्यायालयाने बांधकामास स्थगिती दिली.रस्त्याच्या बाजूने व तिन्ही बाजूंनी अतिशय कमी जागा सोडली असून भविष्यात जर आगीची दुर्घटना घडली तर अग्निशमन दलाला पाईप टाकण्यासाठी आवश्यक असणारी जागा देखील सोडली नसल्याने प्रस्तावित ईमारतीतील व शेजारील इमारतीत मोठी जिवीतहानी होवू शकते.मा.न्यायालयाने स्थगिती दिली असताना देखील काम सुरुच आहे.
न्यायालयाने स्थगीती देवून देखील काम बंद करणे आवश्यक असताना बिल्डरवर योग्य ती कारवाई होत नसल्याने नागरिकातुन रोष व्यक्त होत आहे. या गंभीर विषयांवर सर्व स्तरावरून दुर्लक्षच होत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईत या ईमारतीत घराचे स्वप्न पूर्ण करीत असताना कोणाची फसवणूक होणार नाही याचीही संबंधितांनी काळजी घेणे आवश्यक असणार आहे.