मुदखेड दि.२८: मुदखेड तालुक्यातील वासरी,शंकतीर्थ,आमदुरा, देवापुर येथून दररोज हजारो ब्रास अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. महसूल प्रशासनाचे कोणतेही भय न बाळगता रेती माफीया हे दिवस व रात्रीच्या वेळी भरधाव पणे नंबर प्लेट नसलेल्या व नंबर प्लेटवर काळे ऑइल लावून चार चाकी टिप्पर वाहनाच्या माध्यमातून प्रशासनाला अंधारात ठेवून हजारो ब्रास रेती ची मोठ्या प्रमाणात अवैध तस्करी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याकडे महसूल प्रशासन मात्र कानाडोळा करत असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील वासरी, देवापुर, शंखतीर्थ, आमदुरा येथून दररोज अवैध रेती वाहतूक भरधावपणे टिप्पर ने करतान, अवैध रेतीचे उत्खनन करून बेभावपणे रेती माफियाला आपला व्यवसाय चालत आहेत.

त्याचप्रमाणे रेती माफिया कडून दररोज दिवस रात्र अवैध रेती उत्खनन करून भरधाव पने अवैध रेतीचे टिपर रस्त्यावर सुरू असुन यामुळे दुर्घटना देखील घडु शकते त्यामुळे प्रशासनाने या अवैध रेती माफियाच्याच्या मुसक्या आवळल्या पाहिजे तसेच रेती माफिया चे एजंट हे मुदखेड शहरातील कै. बाळासाहेब ठाकरे चौक, महात्मा बसवेश्वर चौक, बारड रोड तसेच माता रमाई आंबेडकर चौक या ठिकाणी रेती माफियाच्या कडुन जागो जागी चार चाकी वाहने (फोर व्हीलर कार) आपले एजंट थांबून प्रशासनाला अंधारात ठेवूनछ सर्रासपणे आपला अवैध रेतीचा व्यवसाय खुलेआम पने चालवत आहेत.यावर प्रशासनाने त्वरित अवैध रेती उत्खनन करून भरधावपणे रस्त्यावर चालत असलेल्या वहानांना पकडुन ते वहान शासनाने जप्ती केले पाहिजे असेही नागरिकांमधून बोलले जात आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड