दीनानाथ हॉस्पिटल प्रकरणाबाबत आम्ही संपूर्ण चौकशी करत आहेत. तसेच मृत महिलेच्या नातेवाईकांच्या जबाब घेतला आहे. आरोग्य विभागाचा अहवाल आल्यानंतर पुढील गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती संभाजी कदम पोलीस उप आयुक्त यांनी दिली. | Pune News |
पुण्यातील रुग्णालय प्रकरणासंदर्भातील आंदोलनं पाहता हा नागरिकांचा अधिकार आहे असं म्हणत सरकार रुग्णालयावर कारवाई करेल असा शब्द चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. ‘मुजोरी करणे ही मुघलशाही आहे. नेमकी काय चूक झाली आहे सरकार तपासणार आहे’, असं म्हणत सर्व सामान्य नागरिकांचा उपचार घेणे अधिकार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. जबाबदार व्यक्तीला आम्ही सोडणार नाही, कुणालाही या प्रकरणात माफ करणार नाहीत. कडक कारवाई करणार आहोत असं म्हणत त्यांनी या गंभीर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.