सरपंच पदाच्या आरक्षणामुळे तालुक्यात महिला राज येणार….
हिमायतनगर प्रतिनिधी | तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण आज तहसील कार्यालयात हदगावचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या उपस्थितीत प्रवर्गनिहाय आरक्षण सांगून ग्रामपंचायतनिहाय आरक्षणाची चिठ्ठी काढून सोडत जाहिर केले त्यात एकूण 52 ग्रामपंचायती पैकी 27 जागा महिलासाठी तर 25 जागा पुरुषासाठी सोडण्यात आल्या आहेत .
तालूक्यात महिलाराज आले पण आता तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत चा कारभार पतिराज पाहणार अशी चर्चा आरक्षण सोडत ठिकाणी चालू झाली होती. अनुसूचित जातीसाठी एस्सी 7 पैकी 4 महिला राखीव तर अनुसूचित जमाती एसटी 10 पैकी 5 महिला तर ओबीसी 9 पैकी 5 महिला ओपन 26 पैकी 13 महिला अशा एकूण महिलांना 27 तर 25 पुरुष असे 52 ग्रामपंचायतीचे आरक्षण तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या उपस्थितीत आज दि 25 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आले.
तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय आरक्षण खालील प्रमाणे अनुसूचित जाती SC महिलासाठीची गावे वारणटाकळी,दाबदरी, एकंबा, पोटा बु , sc पुरुष करंजी ,घारापूर,शिबदरा ज, अनूसूचित जमाती ST महिला टेंभूर्णी, धानोराज, खडकी बाजार, डोल्हारी , सोनारी, ST पुरुष शिरपल्ली,बोरगडी, जवळगाव, विरसणी, खैरगावज. ओबीसी महिला पारवा बु, टाकराळा बु., पार्डी ज, चिंर्चोडी, महादापूर, ओबीसी पुरुष सरसम बु., बोरगाव ता. , दरेगाव, खैरगाव ता., ओपन महिला वाघी,एकघरी ,जिरोना, कार्ला पी. दुधड, सवना ज, वडगावज, बळीरामतांडा, पळसपूर, कामारी ,दरेसरसम, काडंली खु., कौठा ज., ओपन पुरुष वाई,वाशी, टेंभी,कामारवाडी, मंगरुळ, वटफळी,कांडली, बु, दिघी,आंदेगाव, पोटा खु., पारवा खु, पवना, सिरंजनी, असे सरपंच पदाचे आरक्षण जाहिर करण्यात आले आहे.

अनेक आदिवाशी गावात ओबीसी आरक्षण सुटल्यामुळे काही बांधव जिल्हाधिकारी यांना भेटून समाधान नाही झाले तर ते कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. अनेक दिग्जाच्या अपेक्षेवर फिरले पाणी, आता आरक्षणातील कमकूवत उमेदवाराला उभेकरुन आपल्या रिमोटवर कारभार पाहाण्याचा मनसूबा मुरबी सरपंचाचा दिसून येते त्यामुळे ह्या वेळेस तालुक्यावर कोणत्या सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व निर्माण होईल ह्याची याची उत्कंठा सर्व राजकीय वर्तुळात रंगत आहे