नांदेड दि १२: नविन कौठा नांदेड येथील दलित वस्तील ड्रेनेज, पाणीप्रश्न, सी.सी. नाली. कचरा व्यवस्थापन व पथदिव्य चे काम अनेकदा पाठपुरावा करूनही याची दखल न घेतल्याने दि. १ मे रोजी महानगरपालिके समोर आत्मदहन करीत असल्या बाबत, महापालिकेला इशारा देण्यात आला.
नविन कौठा नांदेड येथील अनेक नागरी सूविधा उदाहरणात पाणी प्रश्न कचरा व्यवस्थापन सीसी नाले डेनिंज विजेच्या खांबावर बसवण्यात आलेले बंद असलेले पथदिवे चालू करणे तसेच महापालिकेव्दारे बसवण्यात आलेल्या बोअरवेल दुरूस्त करणे हे सर्व कामे येथील नागरिकानी वारंवार महापालिकेच्या लक्षात आणून दिले व प्रत्यक्षात भेटुन महानगरपालिकेच्या कर्मचारी अतिरिक्त आयुक्त यांना निवेदनाद्वारे दि.८ एप्रिल . रोजी आयुक्त साहेबांबा प्रत्यक्ष सर्व नागरिकांनी भेटून निवेदनाव्दारे कळविण्यात आले त्यानंतर.
दि.८ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रीय कलाल गौड समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मानवीय सुनिल अनंतवार यांची सुध्दा नियोदनाव्दारे असे कळवली की नवीन कौठा येथील पाणी प्रश्न दलित वस्ती अंतर्गतचे कचरा व्यवस्थापन इत्यादी नागरी सुविधा पूर्ण कायमस्वरूपी सोडवावे अन्यथा महापालिकेवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा सुध्दा सुनील आनंतवार व नवीन कौठा येथील नागरीक उपस्थित राहून घागर मोर्चाचा इशारा महापालिकेला निवेदनाव्दारे रिल्ला होता.
त्यानंतर महापालिकेने १० जानेवारी २०१५ रोजी सुनील आनंतवार यांना पत्राव्दारे कलविण्यात आले होते की अमृत २.० योजने अंतर्गत सदरील ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकुन देण्यात येईल असं पत्राव्दारे कळविण्यात आले होते तरी सुध्दा या कामाला मुहूर्त लागलेला नाही. जर दलित वस्तीवर जाणून यूजुन महापालिका प्रशासन अन्याय करत आहे ह्या कारणामुळे नवीन कौटा नांदेड येथील नागरीक त्रस्त झाले आहेत. एवढे निवेदन एवढे पत्र देउन सुध्दा महापालिकेला जाग येत नसेल तर येथील जनतेने करायच तर काय कराय, महापलिकेच्या अशा कामामुळे होणारा त्रास येथील नागरिकाला सहन करावा लागत आहे.जर 20 एप्रिल पर्यंत या कामात सुरुवात झाली नाही. तर मी जळबा निवृत्ती सोनकांबळे राहणार नवीन कौठा नादेड येथील सहिवासी असुन महापालिकेच्या प्रांगणात आत्मदहन करणार आहे असल्याचा इशारा महापालिका आयुक्तांना देण्यात आला.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड