नांदेड दि. २४ जून : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे मागील एक ते सव्वा वर्षापासून अपात्र व्यक्तीच्या हातात विद्यापीठाच्या तिजोरीच्या चाव्या मनमानी पद्धतीने व आर्थिक तडजोडी करिता देण्यात आलेल्या होत्या. याविरुद्ध डॉक्टर महेश मगर अधिसभा सदस्य यांनी आवाज उठवला व प्रभारी पदाचे चार्ज अपात्र व्यक्तींना देऊ नये याकरिता अधिसभे च्या बैठकीत प्रस्ताव मांडून तो मंजूर करून घेतलाय.तरीही विद्यापीठाच्या प्रशासनाने मनमानी कारभार करत भ्रष्टाचाराला खतपाणी देण्याच्या दृष्टीने अपात्र व्यक्तीची नेमणूक चालू ठेवली होती. याविरुद्ध दिनांक २४ मे २०२५ रोजी पुन्हा एकदा प्रशासना सोबतच माननीय कुलपती, संचालक ,उच्च व तंत्र शिक्षण विभाग पुणे व सहसंचालक उच्च व तंत्र शिक्षण नांदेड यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती.
त्या तक्रारीचा धसका घेऊन तडकाफडकी अपात्र व्यक्तीला कार्यमुक्त करून आता एका नवख्या प्राध्यापकाला विद्यापीठाच्या तिजोरीच्या चाव्या देण्यात आलेल्या आहेत, म्हणजेच त्यांना प्रभारी वित्त अधिकारी या पदावर हातातला भावलं म्हणून बसविण्यात आलेले आहे.
मोहम्मद शकील हे लेखा अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.त्यांना उप वित्त व लेखाधिकारी पदाचे नियमबाह्य पदोन्नती देण्यात आली होती. परंतु सहसंचालक कार्यालय नांदेड यांनी ही पदोन्नती सपशेलपणे नाकारली. यामध्ये विद्यापीठाची नाचक्की झालेली आहे .प्रभारी वित्त व लेखाधिकारी च्या कार्यकाळामध्ये विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला व फोफावला होता. याबाबत अनेक तक्रारी वारंवार माननीय कुलगुरू महोदयांकडे करण्यात आल्या होत्या. परंतु त्यांनी या सर्व प्रकरणाकडे सपशेलपणे डोळझाक केली.क्रीडा विभागामध्ये मागील वर्षी क्रीडा महोत्सवाच्या वेळेस चहा पाणी नाश्ता त्याचे अंदाजे चाळीस हजार रुपये पेक्षा अतिरिक्त चे बिल काढण्यात आले. तसेच मैदान दुरुस्ती व देखभाल साहित्य खरेदी व दुरुस्ती यासाठी विना जीएसटी चे इस्टिमेट बिल घेण्यात आले. नंतर या प्रकरणाची माहिती अधिकार माहिती मागविण्यात आली असता.
मुळ बिलात खाडाखोड करून कॅश मोमो करण्यात आले आहे. ज्या फार्मचे हे बिल आहे ती नांदेड मधली नावाजलेली फॉर्म आहे आणि त्यांच्याकडे अधिकृत जीएसटी नंबर सुद्धा आहे. म्हणजे शासनाचे फसवणूक बोगस इस्टिमेट बिलाचे कॅश मेमो तयार करण्यात आले तसेच आमचे उत्पन्न 20 लाखापेक्षा कमी आहे त्यामुळे जीएसटी लागू नाही असे चुकीचे हमीपत्र लिहून घेण्यात आला.
याबाबत पुराव्यांशी मा. कुलगुरू महोदयांकडे तक्रार देऊन सुद्धा त्यांनी संबंधित क्रीडा विभागाच्या कर्मचाऱ्याला तातडीने निलंबित करतो असे आश्वासन दिले होते,परंतु कोणतीही कारवाई केली नाही.मात्र त्याला या प्रकरणातून वाचविण्यासाठी बदली करण्यात आली. सदर बदली रद्द करण्यासाठी तो कर्मचारी विद्यापीठ प्राधिकरण सदस्य आर्थिक व्यवहाराचे अमिष व राजकीयव्यक्तीं मार्फत दबाव आणून बदली रद्द करून पुन्हा क्रीडा विभागाला जाण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
भविष्यामध्ये पुन्हा विद्यापीठांमध्ये राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव होणार आहे. हा एकच प्रकार नाही असे अनेक प्रकार विद्यापीठाच्या या प्रभारी वित्त व लेखा अधिकारी यांच्या कार्यकाळात खरेदी दरम्यान झालेले आहेत. या सर्वांची पुराव्यानिशी माहिती प्रशासनाला देण्यात येणार आहे व त्यानंतर प्रशासन काय कारवाई करते हे भविष्यात पाहावे लागेल.
सध्या विद्यापीठाच्या प्रभारी राजमुळे आणि खरेदी समितीमध्ये चुकीचे निर्णय घेण्याचा सपाटा विद्यापीठाने लावला आहे. साफसफाई व स्वच्छतेच्या कामासाठी मजूर पुरवठ्याची निविदा 16 जानेवारी 2025 ला प्रसिद्ध करण्यात आली होती निविदा अद्यापपर्यंत हे उघडली नाही ही का प्रलंबित ठेवण्यात आली तब्बल साह महिन्यानंतर तांत्रिक कारणास्तव ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली असे दिनांक 23 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये आर्थिक तडजोडी झाल्या नाही व कोणते गोडबंगाल आहे हे लवकरच माध्यमांमध्ये पुराव्यानिशी उघड करण्यात येईल.
ज्या लेखा अधिकार्याला सहसंचालक कार्यालयाने उपवित्त व लेखा अधिकारी या पदावरची पदोन्नती रद्द केली. त्याच अधिकाऱ्याला विद्यापीठाने पुन्हा प्रभारी उप वित्त व लेखा अधिकारी या पदाचा अतिरिक्त कारभार दिला आहे. याचाच अर्थ ज्याची सेवानिवृत्ती दोन महिन्यावर आली आहे व नियमबाह्य पद्धतीने प्रभारी वित्त व लेखा अधिकारी पदाचा कार्यकाळात केलेले भ्रष्टाचारावर पडदा टाकण्यासाठी व राहिलेल्या आर्थिक तडजोडी पूर्ण करण्यासाठी हे प्रभारी पद विद्यापीठ प्रशासनाने दिले असेल अशी चर्चा कर्मचारी अधिकारी वर्गात आहे
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!