जब्बर शेख
मुदखेड दि.७: मुदखेड शहरात सकाळी उमरी रोडवरील ओमकार गार्डन येथे भोकर विधानसभा बूथ आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी उपस्थित काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्याचे सह प्रभारी कुणाल चौधरी यांनी सांगितले की राज्यात विविध ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून आढावा बैठक घेतना राज्यातील नागरिकांची प्रचंड प्रमाणात नाराजी सह इतर कारणांनी येत्या काळात राज्यात विधानसभेत महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे सांगत विद्यमान खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कडाडून टिका करत काँग्रेस पक्षाकडून दोनदा राज्याचे मुख्यमंत्री पदा सहित विविध मंत्री म्हणून संधी उपलब्ध करून दिली जो माणूस पक्षाचा होत नाही तो जनतेचा कसा होणार आणि आपल्या खिशात नारळ ठेवत फोडण्याचे नाटक करत सोंग करतो तो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना येऊन आश्वासन देते तो काय विकास करणार असे खोचक टीका आपल्या भाषणातून केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे बी आर कदम, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार रवींद्र चव्हाण उर्फ बंडू पाटील, तालुकाध्यक्ष मुदखेड काँग्रेस कमिटी प्रताप देशमुख ,शहराध्यक्ष
कैलास गोडसे ,अर्धापुर काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील वानखेडे, दानमहर्षी समाजसेवी दादाराव पाटील ढगे,
अर्धापूर काँग्रेस शहराध्यक्ष मिर्झा फसीउल्ला बेग, भोकर काँग्रेस तालुकाध्यक्ष गोविंदराव गौड , भोकर शहराध्यक्ष तौसिफ इनामदार, काँग्रेस कमिटी , युवक शहर अध्यक्ष मुजीब पठाण, शहर उपाध्यक्ष सुर्यकांत चौदंते,जिल्हा उपाध्यक्ष राजू चौदंते,जिल्हा सहसचिव गिरीष कोत्तावार यांच्यासह भोकर ,अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यातील व ग्रामीण भागातील पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव हामंद यांनी केले आभार आभार प्रदर्शन नांदेड जिल्हा प्रवक्ता सुभाष लोणी यांनी केले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड