दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.७:धर्माबाद तालुक्यातील व शहरातील 1 फेब्रुवारी 2019 नंतर फेरफार केलेल्या शेतकऱ्यांना पी. एम किसान योजना व नमो शेतकरी सन्मान निधी या दोन्ही योजनेपासून तालुक्यातील व शहरातील असंख्य शेतकरी वंचित आहेत व सन 2023 च्या खरीप हंगामातील ई पिक पाहणी पोर्टलवर नोंदीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना असंख्य शेतकरी वंचित असल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये अनुदान वर्ग करावे व खरीप हंगाम 2023 च्या सातबारा उतारा वर नोंद आहे मात्र ई पीक पाहणी मध्ये त्यांचे नाव आलेले नाही अशा वंचित शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये तात्काळ मध्ये अनुदान वर्ग करण्यात यावे अशा अशा प्रमुख तीन मागण्या सामाजिक कार्यकर्ते नागनाथ पाटील माळगे यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी महोदयाकडे लेखी निवेदनाद्वारे केले आहेत . 2019 नंतर फेरफार केलेल्या धर्माबाद तालुक्यातील व शहरातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जवळपास चार वर्ष संपले तरी शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचा लाभ मिळत नसेल तर अडचणी काय ? हे तरी कळवा व सदरील शेतकरी 2019 नंतर फेरफार केलेल्या पी. एम.किसान योजना व नमो शेतकरी सन्मान निधी या दोन्ही योजनेचा लाभ मिळत नसल्याने दोष कुणाचा असा प्रश्न धर्माबाद तालुक्यातील व शहरातील शेतकऱ्यांना पडला आहे या दोन्ही योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा तथा सन 2023 च्या खरीप हंगामातील ई पिक पाहणी पोर्टलवर नोंदीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना असंख्य शेतकरी वंचित असल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये तात्काळ मध्ये अनुदान वर्ग करण्यात यावे व खरीप हंगाम 2023 च्या सातबारा उतारा नोंद आहे मात्र ई पीक पहानी मध्ये त्यांचे नाव आले नाही अशा वंचित असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये अनुदान वर्ग करण्यात यावे तथा तथा 1 फेब्रुवारी 2019 च्या नंतर फेरफार केलेल्या तालुक्यातील व शहरातील असंख्य शेतकरी पीएम किसान योजना व नमो शेतकरी सन्मान निधी या दोन्ही योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळमध्ये योजनेचा लाभ मिळावा माझी शासनाला विनंती आहे तालुक्यातील व शहरातील माझ्या मायबाप शेतकऱ्यांच्या प्रमुख तीन मागण्या आहेत हे तीन मागण्या तात्काळ मध्ये मार्गी लावून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नागनाथ पाटील माळगे रोशनगावकर यांनी केली आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड