• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, July 3, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र औरंगाबाद

महिला बचतगटांसह विविध योजनांच्या लाभार्थ्यांना 78 लाखांचे कर्जवाटप !
सर्वसामान्य, कष्टकरी तसेच गरजूंना उद्योगांसाठी बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध !!

Satyaprabha News by Satyaprabha News
23 January 2024
in औरंगाबाद, महाराष्ट्र
32
SHARES
213
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
img 20240123 2003362852426629151379496

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी ! विजय पाटील !
दि : २३/०१/२०२४
महिला बचतगटांच्या विविध उत्पादनांला आवश्यक बाजारपेठ मिळवून देण्यासोबतच महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी बचतगटाच्या योजनांसह विविध योजनांची प्रभावीपणे अंमबबजावणी करा, असे निर्देश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज दिले. सर्वसामान्य, कष्टकरी तसेच गरजूंना उद्योगासाठी बँकेच्या माध्यमातन राबविण्यात येणाऱ्या
प्रधानमंत्री स्वनिधी योजना व महिला बचतगटांना अधिकाधिक योजनांचा लाभ द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे महिला बचत गटांसह विविध योजनांच्या लाभार्थ्यांना कर्जवाटप कार्यक्रमात डॉ. कराड बोलत होते. यावेळी एसबीआयचे जितेंद्र ठाकूर, मनपाचे
उपायुक्त रणजित पाटील, एसबीआयचे समन्वयक डॉ. सतिश टाके तसेच इतर बँकेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
देशात बँकेच्या माध्यमातून विविध योजनांमधून बचतगटांना तसेच नागरिकांना कर्जपुरवठा करण्यात येत असून कर्जाची परतफेडही सुलभतेने होत आहे, ही महत्त्वाची बाब आहे. यामध्ये महिला लाभार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. महिला काटकसरीने व नियोजन करून बचतगटाच्या माध्यमातून स्वावलंबी होत आहेत. आपल्याला कर्जासाठी बँकेत जाण्याऐवजी
बँकेचे प्रतिनिधी आपल्याकडे येत आहेत. ही बाब उल्लेखनीय आहे. महानगरासह जिल्हयातील बचतगटाच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचेही डॉ. कराड यांनी सांगितले.
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबाला
व्यवसायांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची योजना आधार देणारी आहे. राज्यात मोठया प्रमाणात बँकां या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुढे आल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशात विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. बँक खाते नसलेल्यांचे खाते उघडणे, विमा योजनेचा सर्वसामान्यांना लाभ देणे आणि अर्थ सहाय्यापासून वंचित
असलेल्यांना ते उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचेही डॉ. कराड म्हणाले.

या महिला बचत गटांना कर्जाचे वाटप – फेरीवाल्यांचे बँकेत खाते, आधार आणि महानगरपालिकेत नोंदणी असल्यास त्यांच्यासाठी स्वनिधी योजना आहे. प्रथम 10 हजार रुपये कर्ज आणि वेळेवर परतफेड केल्यास 20 हजार व
त्यानंतर 50 हजार रुपये कर्ज देण्यात येईल. योजनेतून बचतगटातील महिला, डेअरी, फळविक्रेते, भाजीविक्रेते तसेच फेरीवाले व छोटे व्यावसायिक यांच्या कौटुंबिक अर्थव्यवस्थेला हातभार लावणारी ही योजना आहे. देशात मोठया प्रमाणात जनधन खाते सुरू करण्यासोबत या खात्यांशी आधार व मोबाईल जोडणी केल्याने लाभार्थ्यांच्या खात्यात थेट आर्थिक
मदत पोहोचविणे शक्य झाले आहे. प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना, उज्वला गॅस योजना यासह विविध योजनेतून सर्वसामान्यांना आधार देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

महानगरातील घरा-घरात गॅसलाईनचे काम प्रगतीपथकावर सुरू आहे. आज बचतगटाच्या माध्यमातून जवळपास 17 कोटी
रुपयांचे कर्जवाटप करण्यात येत आहे. प्रशासनाला कर्जवाटपाचे देण्यात आलेले उदिष्ट पूर्ण झाले असून वेळेवर कर्जफेड केल्याने 100 टक्यांवरुन अधिकच्या लाभार्थीना कर्जवाटप करण्यात येत आहे. प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेतून पाच लाख रूपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात.
डॉ. कराड यांच्या हस्ते एसबीआय बँकेकडून यश सहारा महिला बचतगटाला 9 लाख 50 हजार, जहेदिया महिला बचतगट 9 लाख 50 हजार, सृष्टी महिला बचत गटाला 9 लाख 50 हजार, श्री स्वामी समर्थ महिला बचत गट 9 लाख 50 हजार, ओमसाई महिला बचतगट 9 लाख 50 हजार तसेच बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून विशाखा महिला गटाला 10 लाख रुपये तर एमजीएम
बँकेकडून ददिरा लोंखडे यांना दुध डेअरी व्यवसायासाठी 20 लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.

मनपाचे उपायुक्त रणजित पाटील यांनी बचतगटाने सुरुवातीला 10 हजार रुपये कर्ज वेळेवर भरणा केल्यास पुढील कर्जात 20 हजार ते 50 हजार पर्यंत कर्ज मिळत राहते. बँकेच्या दिलेल्या उदिष्टापेक्षाही
अधिकचे उदिष्ट गाठले आहे. पीएम स्वनिधी व बचतगट यांच्या अंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज वाटपाविषयी त्यांनी माहिती दिली.
यावेळी महिला बचतगट तसेच विविध उद्योजक यांच्यासह पात्र लाभार्थीना कर्ज धनादेश प्रदान करण्यात आले. सुत्रसंचालन श्रीमती निता पानसरे यांनी केले. यावेळी पीएम स्वनिधी लाभार्थी, नागरिक,
बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सत्यप्रभा न्यूज

Previous Post

विद्यार्थ्याला महाविद्यालयातच विष पाजले, चौघांनी हात पाय धरले तर दोघांनी विष पाजले !
बीड जिल्ह्यातील खळबळजनक घटना !!

Next Post

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार

Next Post
image editor output image2024551083 1706022100099

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    image editor output image 510237900 1782571113481

    भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणी

    27 June 2026
    image editor output image 533325925 1782570472729

    चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

    27 June 2026

    Recent News

    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    image editor output image 510237900 1782571113481

    भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणी

    27 June 2026
    image editor output image 533325925 1782570472729

    चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

    27 June 2026

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज