
👉🏻शहरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त…
हिमायतनगर प्रतिनिधी/- देशातील आघाडीची मोबाईल नेटवर्क सेवा पुरवणारी कंपनी असलेल्या Jio चे नेटवर्क दि 17 जानेवारी ते 18 जानेवारी ह्या दोन दिवसा पासून डाऊन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हिमायतनगर शहरासह परिसरातील जिओची मोबाईल आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे काल दि 17 जानेवारी च्या दुपारी साधारण सव्वाबाराच्या सुमारास जिओचे नेटवर्क गुल व्हायला सुरुवात झाली त्यामुळे हिमायतनगर शहरांमध्ये आजकाल नेटवर्क शिवाय कोणतेही काम होत नाही त्यामुळे शहरातील नागरिकांचे फोन बंद पडल्यामुळे तुर्तास वैतागून गेला असल्याचे चित्र दिसून येत आहे शहरात कालपासून महावितरण ची बत्ती व जिओचे नेटवर्क गुल कशामुळे झाले हा बिघाड नेमका कशामुळे झाला आहे, याची माहिती अद्याप काही समजू शकलेली नाही देशपातळीवर नामांकित असलेल्या Reliance jio कडूनही यासंदर्भात कुठलाही दुजोरा देण्यात आलेली नाही.
या बाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे खूप मोठ्या प्रमाणात शासकीय कामे करण्यासाठी ग्रामीण भागातून नागरिक येत असतात शहरातील महावितरणची बत्ती व जिओचे नेटवर्क काल पासून गुल झाल्यामुळे शहरात शासकीय कामे करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची धावपळ मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे वैतागून गेलेल्या व शासकीय कार्यालयास खेटे मारून परेशान झालेल्या नागरिकांन मधून महावितरण व जिओ कंपनी विरोधात संताप व्यक्त केला जात आहे काल पासून तब्बल 24 तास उलटूनही शहरातील जिओची सेवा पूर्ववत झालेली नाही. मात्र, कंपनीकडून ही तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु असल्याची माहिती आहे पण लाईट नसल्यामुळे नेटवर्क गुल का होत आहे व इतर कंपनीचे नेटवर्क कार्यान्वित असल्यामुळे जि.ओ.चे सिम ग्राहकांकडून बंद करण्याच्या प्रतिक्रिया येत आहेत याची रिलायन्स जिओ कंपनीच्या मालकांनी व शहरातील महावितरणच्या अभियंतांनी तात्काळ दखल घेऊन शहरातील नागरिकांची होणारी गैरसोय तात्काळ दूर करून शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत करून नागरिकांची होणारे गैरसोय दूर करावी अशी मागणी सुजाण नागरिकांतून होत आहे
चौकट
काल व आज दिवसभर हिमायतनगर शहरातील महावितरणची लाईट व जिओचे नेटवर्क गुल झाल्यामुळे नागरिकांना लाईट व फोनच्या नेटवर्क आभारी मोठ्या प्रमाणात गैर सोईचा सामना करावा लागत आहे
लाईट व नेटवर्क दिवसाच का गुल होत आहे ? असा प्रश्न सुधा नागरिकांकडून विचारला जात आहे