Mumbai Mayor Reservation : महाराष्ट्रात 29 महापालिकेचा निकाल लागला असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईकडे सर्वांचं लक्ष होतं. मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता आली असून आता महापौर कोण होणार याबद्दल उत्सुकता आहे. मुंबई महापौर संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात नवीन महापौराची घोषणा होईल असं सांगण्यात येत आहे.
…म्हणून अजून मुंबईचा महापौर ठरला नाही नगर विकास विभागाकडून आरक्षण सोडत निघाल्यानंतर नवीन महापौर ठरणार आहे. तर नगर विकास विभागाकडून जानेवारीच्या पुढील आठवड्यात सोडत काढण्यात येणार आहे. सोडत काढण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून आरक्षण सोडत निघाल्यावर भाजपचा महापौर पदाचा चेहरा ठरणार.
त्यामुळे जानेवारी महिन्याच्या अखेरीस मुंबईला नवा महापौर मिळण्याची दाट शक्यता असून उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदाच्या हालचालींनाही वेग येईल. महापौर पदासाठी खुला, खुला महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गा (ओबीसी) महिला, नागरिकांचा मागासवर्ग, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जाती अशी आरक्षणे निश्चित केलं गेलं आहे. आरक्षण कोणत्या वर्गासाठी निघते, यावरच संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित होणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यातील सोडत ही अत्यंत भाजपसह नगरसेवकांसाठी महत्त्वाची आहे.
भाजपकडून महापौरपदासाठी संभाव्य नावं कोणती?
1 तेजस्वी घोसाळकर दहिसरमधील प्रभाग क्रमांक 2 मध्ये 10,000 पेक्षा जास्त मतांनी तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या आहेत. त्या सध्या भाजपच्या सर्वात मोठ्या “पोस्टर गर्ल” आहेत. निवडणुका जाहीर झाल्यावर तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
2 प्रकाश दरेकर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. प्रचंड मतांनी विजयी झालेले दरेकर कुटुंबाचा मुंबईतील, विशेषतः वायव्य मुंबईत मराठी मतांवर मोठा प्रभाव पाहिला मिळतो. त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव यामुळे हे पद त्यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येते.
3 प्रभाकर शिंदे बीएमसीमध्ये भाजप गटाचे माजी नेते प्रभाकर शिंदे हे पक्षाच्या सर्वात अनुभवी नगरसेवकांपैकी एक मानले जातात. त्यांना महापालिकेच्या कामकाजाची आणि नियमांची सखोल समज असून मराठी चेहरा आणि अनुभव असल्याने त्यांना महापौरपदासाठी हे उत्तम नाव मानले जातेय.
4 मकरंद नार्वेकर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर हे दक्षिण मुंबईतील एक प्रमुख नाव असून ते सातत्याने जिंकत आले आहेत. कुलाबा परिसरात त्यांची मजबूत पकड आणि मराठी असून त्यांची प्रतिमा आधुनिक आणि पुरोगामी नेत्याची आहे. त्यामुळे मुंबई महापौरपदासाठी भाजप या नावाचाही विचार करत आहे.
5 राजश्री शिरवाडकर राजश्री शिरवाडकर या प्रभाग क्रमांक 172 मधून विजयी झाल्या आहेत. या भाजपच्या एक निष्ठावंत आणि आक्रमक मराठी महिला चेहरा मानला गेला आहे. जर पक्षाने महिला महापौर (आरक्षणाच्या आधारे) करण्याचा निर्णय घेतला तर राजश्रीचं नाव आघाडीवर मानले गेले आहे.