नवीन नांदेड दि.१२: सामाजिक कार्यकर्ते जळबा सोनकांबळे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर पाटी
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस नवीन कौठा भागातील ज्येष्ठ नागरिक सोपान भिसे अशोक मुळे बाबुराव पाईकराव मोहन जोगदंड राम गालफाडे अंबादास शिरसाट यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते जळबा सोनकांबळे यांच्या हस्ते महापुरुषांच्या नावाचा जयघोष करत लोकशाहीर साहित्य सम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे नगर पाटीचे रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे शिदोधन ढवळे नवयुवक भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष सचिन कांबळे तसेच गजानन धोगंडे आकाश वाघमारे अंकुश गालफाडे गोपी सावळे विकी कांबळे धीरज तायडे लक्ष्मीबाई भोकरे परमेश्वर धोंगडे अतिश लिंगायत आदी युवकांनी परिश्रम घेतले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड