तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी!

दिनांक 19 ,20 व 21 मे 2026 रोजी कस्तुरी मंगल कार्यालयासमोर नांदेड रोड येथे भव्य दिव्य असा सर्व धर्मीय चतुर्थ पट्टाभीषेक सोहळा वर्धापन दिन साजरा करण्यात येत असून त्याची अतिशय भव्य अशी तयारी पूर्ण झाली. पंचक्रोशीतील सर्व गावकऱ्यांनी सढळ हाताने या कार्यक्रमास योगदान दिले असून त्यामुळे हा सोहळा अधिकच व्यापक आणि मोठ्या स्वरूपात संपन्न होत आहे. सकाळी शिवयोगी श्री बसवलिंग स्वामी संजीवन समाधी रुद्राभिषेक करून सुरुवात होणार असून रुद्र स्वाहाकार पंचकुंडी यज्ञ तसेच भव्य पारायण संकीर्तन व धर्म सभा, नगर भोजनाने हा सोहळा संपन्न होणार असून यासाठी उज्जैन जगद्गुरु श्री श्री श्री 1008 सिद्धलिंग राज देशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून त्यांची हत्तीवरून मिरवणूक निघणार आहे, लाखो भाविक भक्त,सर्व धर्मीय साधुसंत या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. ष.ब्र.108 सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली साखरखेर्डा यांच्या आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होणार आहे.तरी महादेव मठ संस्थान हादगावचे
मठाधिपती ष.ब्र. १०८ सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली यांनी सर्व सदभक्तांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून धर्मोपदेश तथा साधुसंत दर्शन ,महाप्रसाद यांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे





















