नांदेड दि.२४: आज ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर युवा मंच नांदेड तर्फे मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सकाळी ८ते सायंकाळी ५ पर्यंत करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटक म्हणून विशाल वाघमारे (शाखा प्रबंधक युनियन बँक नांदेड )तर प्रमुख उपस्थितीमध्ये ऍड अस्मिता वाघमारे -दवणे (विभागीय कायदे प्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र ) ह्या होत्या यावेळेस प्राचार्य डॉ.डी.यु. गवई, प्रा. एकनाथ खिल्लारे ,डॉ.हर्षवर्धन दवणे,स्वप्नील नरबाग हे उपस्थित होते या शिबिरात तपासणीसाठी आलेल्या उपासक व उपासिका यांना त्यांच्या आरोग्याबाबत डॉ.गोविंद पावडे, डॉ. विनय पाटील, डॉ. सुनिल गायकवाड ,डॉ. संदेश वाठोरे ,डॉ.अमरदिप हनवंते यांनी माहिती मार्गदर्शन व तपासणी केली या शिबिराचा जवळपास 345 लोकांनी लाभ घेतला असून बी आर एस चे नेते सुरेश दादा गायकवाड यांनी या शिबिरास भेट देऊन आयोजकाची या उपक्रमाची स्तुती व प्रोत्साहन दिले या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन फुले शाहू आंबेडकर युवा मंचाचे महानगर अध्यक्ष तथाच मा सरपंच अमोल महिपाळे यांनी केले असून त्यांना जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरज वाघमारे, सय्यद मुज्जमिल, अक्षय सोनकांबळे यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयवर्धन गच्चे ,सागर घोडके ,डॉ. प्रवीणकुमार सावंत, अक्षय कांबळे, प्रकाश दिपके ,दिनेश येरेकर ,सचिन राजभोज, विजय थोरात आदींनी केले #सत्यप्रभा न्यूज #नांदेड