नांदेड दि.११: नांदेड शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसणेकामी व अग्नीशस्त्र वापरुन गुन्हे करणारे व अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे गुन्हेगारांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरीक्षक, श्री उदय खंडेराय यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था.गु.शा. चे पथकाला आदेश दिले होते.
दिनांक 10/06/2024 रोजी गुप्त बातमीदाराकडून कापुस संशोधन केंद्रा समोरील केळी मार्केट टी पॉईंटकडे जाणाऱ्या रोडवर एक इसम गावठी पिस्टल बाळगुन असून तो विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठांना देवून वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष शेकडे व पोलीस अंमलदार असे कापुस संशोधन केंद्रा समोरील केळी मार्केट टी पॉइंटकडे जाणाऱ्या रोडवर गेले असता सदर ठिकाणी सापळा लावून इसम नामे राधेशाम पंजाबराव भालेराव, वय 24 वर्ष, व्यवसाय मजूरी, रा. सखोजीनगर, नांदेड यास ताब्यात घेवून त्याचेकडून बेकायदेशीरीत्या विक्रीसाठी आणलेली एक गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व 02 रिकाम्या मॅग्झीन असा एकूण 41,000/-रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी मा.श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा.श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा.श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांचे मार्गदर्शनाखाली श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा, नांदेड, सपोनि श्री संतोष शेकडे, पोउपनि हरजिंदरसिंघ चावल, पोहेकॉ/ रुपेश दासरवार, पोहेकॉ/बालाजी तेलंग, पोकॉ/साहेबराव कदम, पोकॉ/तानाजी येळगे, पोकों/अनिल बिरादार, पोकॉ/मोतीराम पवार, पोकों/राजीव बोधगिरे, पोकॉ/अकबर पठाण, पोकॉ/इसराइल शेख, पोकॉ/गजानन बयनवाड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड














**mitolyn reviews**
Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.