• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, June 19, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

आंतरजातीय धर्मीय विवाह वधू वर सूचक केंद्र अंनिस सुरू करणार जाती निर्मूलनाच्या दिशेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आश्वासक पाऊल’अंनिस’च्या राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय.

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
12 June 2024
in Top News, किनवट, महाराष्ट्र
image editor output image913319648 1718185080399
33
SHARES
219
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.१२ :महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणीची बैठक दि. ८ व आणि ९ जून रोजी सोलापूर येथे हिराचंद नेमचंद कार्यालयात शालिनीताई ओक विचारमंचावर अत्यंत उत्साहात संपन्न झाली.

राज्यभरातून उपस्थिती:
या बैठकीसाठी राज्यभरातून १७५ अंनिस कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये १९ जिल्ह्यातून जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा प्रधान सचिव, राज्य विभागांचे कार्यवाह, राज्य कार्यकारिणीचे सदस्य, सल्लागार मंडळाचे सदस्य आणि क्रियाशील कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढील कामाची दिशा:
दोन दिवसाच्या अंनिसच्या राज्य कार्यकारणी बैठकीमध्ये महत्त्वाचे सहा निर्णय घेण्यात आले. ते असे
१) नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्याच्या निकालाबाबत मुंबई हायकोर्टात अपील करणे. निकालाचा मराठी अनुवाद करून तो लोकांच्या पर्यंत पोहोचवणे.

२) ‘नरेंद्र दाभोलकर यांचे विचार घरोघरी’ हे अभियान २० जून ते २० ऑगस्ट २०२४ या दरम्यान सुरू करणे. यामध्ये डॉ. दाभोलकरांच्या 15 पुस्तिका प्रकाशित करून त्याच्या साठ हजार प्रती वितरीत करणे.

३) आंतरजातीय जातीय, आंतरधर्मीय विवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय वधू वर सूचक केंद्र सुरू करणे.

४) धार्मिक स्थळावर दैवी उपचार घेणाऱ्या मानसिक रोग्यांसाठी ‘दवा आणि दुवा प्रकल्प’ सुरू करणे.

५) सन २०२४ हे वर्ष ‘प.रा.आर्डे प्रबोधन प्रशिक्षण वर्ष’ जाहीर करून पुढील सहा महिन्यात प्रामुख्याने सोलापूर,सांगली,पुणे, रत्नागिरी, खेड या ठिकाणी दोन दिवशीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजन करणे. तसेच मुंबई, बीड, अहमदनगर, पालघर, धाराशीव, रत्नागिरी या जिल्ह्यात शिक्षक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे.

६) सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे.

image editor output image912396127 17181850653961523109561091232619

उद्घाटन, विशेष अंक प्रकाशन:
शनिवारी ८ जून रोजी सकाळी दहा वाजता माजी आमदार कॉ. नरसय्या आडम यांच्या हस्ते अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला निकाल विशेषांका’ चे प्रकाशन करून बैठकीचे उद्घाटन झाले.

अहवाल सादरीकरण
त्यानंतर डॉ. हमीद दाभोलकर आणि राहुल थोरात यांनी गेल्या सहा महिन्यात राज्यात झालेल्या कामाचा अहवाल सादर केला. त्यानंतरच्या दोन सत्रात महाराष्ट्रातील राज्यभरातून आलेल्या जिल्हा कार्याध्यक्षांनी/ सचिवांनी आपल्या जिल्ह्याचा कार्य अहवाल राज्य कार्यकारणी समोर सादर केला.

निकालाचा अन्वयार्थ :
सायंकाळी पाच वाजता ‘डॉक्टर नरेंद्र दाभोलकर खून खटल्याच्या निकालाचा अन्वयार्थ’ यावर मुक्ता दाभोलकर, मिलिंद देशमुख, डॉ. हमीद दाभोलकर, फारुख गवंडी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या निकाल पत्रामध्ये मा.न्यायमूर्तींनी नोंदवलेली निरीक्षणे अत्यंत महत्त्वाची आहेत. ती लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत.

देणगीदारांचा सन्मान
सायंकाळी सहा वाजता सोलापूर शहरातील अंनिसच्या देणगीदारांचा आणि जाहिरातदारांचा सन्मान ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अंनिस मध्ये विशेष काम करणाऱ्या रमेश माने, शंकर कणसे,नंदिनी जाधव, रामभाऊ डोंगरे, भगवान रणदिवे, गीता हसूरकर या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

विशेष व्याख्यान:
सायंकाळी सात वाजता मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक सरफराज अहमद यांचे ‘भारतीय मुसलमान आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण झाले.
रात्री नऊ वाजता अंनिस कार्यकर्त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

निर्भय मॉर्निंग वॉक:
दुसऱ्या दिवशी रविवारी ९ जून रोजी सकाळी सहा वाजता हिराचंद नेमचंद कार्यालय पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत कार्यकर्त्यांनी ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढला. निर्भय मॉर्निंग वॉकच्या वेळी कार्यकर्त्यांनी चळवळीची गाणी आणि घोषणा दिल्या.

विभागवार आढावा :
रविवारी दिवसभर संघटना बांधणी विभाग, प्रशिक्षण विभाग, सोशल मीडिया विभाग, प्रकाशन विभाग, युवा आणि महिला विभाग, आंतरजातीय सहाय्य विभाग आणि मानसिक आरोग्य विभाग या विभागांच्या कामांचा आढावा आणि पुढील सहा महिन्यांच्या कामांचे नियोजन केले गेले.

समारोप:
राज्य कार्यकारणी बैठकीचा समारोप रविवारी दुपारी तीन वाजता प्रसिद्ध सर्जन व डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे वर्गमित्र डॉ. बी.वाय. यादव (अध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी) यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. कृष्णा मस्तूद, ग्रामीण कथाकार डॉ.अर्जुन व्हटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी डॉ. यादव यांनी डॉ. दाभोळकर यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, डॉ. दाभोलकर यांनी विद्यार्थीदशेत मिरज मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे आंदोलन उभे करून २६ दिवस संप घडवून आणून मिरज मेडिकल कॉलेजला मान्यता मिळवून दिली. या त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना विद्यार्थी होस्टेलमध्ये येऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करावी लागली होती.

सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कृष्णा मस्तूद म्हणाले की,अंधश्रद्धेच्या गर्तेत लोक स्वतःला अडकवून घेऊन स्वतःवर दुःख ओढवून घेतात.अंधश्रद्धेमध्ये गरीब लोक अडकले आहेत. त्यांची फसवणूक होतेय हे त्यांच्या लक्षात येत नाही ही मोठी शोकांतिका आहे. जात ही मोठी अंधश्रद्धा आहे, रोटी बेटी व्यवहार आपण सुरू केले शिवाय जाती निर्मूलन होणार नाही. अंनिसने या कामी पुढाकार घ्यावा.

‘हम होंगे कामयाब एक दिन’ या गीताने बैठकीची सांगता झाली.

प्रमुख उपस्थिती :
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सोलापूर येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला राज्य कार्यकारणीचे सदस्य मिलिंद देशमुख, मुक्ता दाभोलकर, अण्णा कडलास्कर, डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, सम्राट हटकर, विनोद वायंगणकर, रामभाऊ डोंगरे, नंदिनी जाधव, प्रा. अशोक कदम, मुंजाजी कांबळे, प्रशांत पोतदार,फारुख गवंडी, प्रकाश घादगिने, निळकंठ जिरगे उपस्थित होते.

उत्कृष्ट संयोजन
दोन दिवसाच्या या राज्य कार्यकारणी बैठकीचे उत्कृष्ट संयोजन सोलापूर जिल्हा अंनिसच्या कार्यकर्त्या उषा शहा, मधुरा सलवारु, अंजली नानल, निशा भोसले, अस्मिता बालगावकर, ब्रह्मानंद धडके, हेमंत शिंदे, विनायक माळी यांनी केले.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

एक गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व 02 रिकाम्या मॅग्झीनसह एका आरोपीस अटक स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कामगिरी

Next Post

बासर सामूहिक सरस्वती पूजन सोहळा व विद्यारंभ सोहळ्याचे आयोजन

Next Post
image editor output image914243169 1718185223051

बासर सामूहिक सरस्वती पूजन सोहळा व विद्यारंभ सोहळ्याचे आयोजन

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • गुलामांना
  • मला एक दिवस ईडी आणि सीबीआय दिल्यास गिरीश महाजन यांना फोडून नाही दाखवलं तर बघा...
24 तासांत गिरीश महाजन यांना फोडून दाखवेन.... - संजय राऊत, खासदार, ठाकरे गट
#SanjayRaut #GirishMahajan #MaharashtraPolitics #MarathiNews #SatyaprabhaNews
  • उबाठाच्या सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे काय मागणी केली आहे? त्यांनी आपला नेता निवडला आहे का? लोकसभा अध्यक्षांनी त्यांना मान्यता दिली आहे का? त्यांनी काही वेगळा व्हिप काढलेला आहे का? या सर्वांचे उत्तर मिळाल्याशिवाय ठाकरे गटाच्या व्हिपला किती महत्त्व आहे याबाबत स्पष्टपणे सांगता येणार नाही. - उज्ज्वल निकम, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ
#UjjwalNikam #MaharashtraPolitics #ShivsenaUBT #MarathiNews #SatyaprabhaNews
  • रावसाहेब दानवे म्हणतात संजय राऊत काय भाषा वापरतात. पण जे रावसाहेब दानवे प्रामाणिक शेतकऱ्यांना
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • या देशात गेल्या 12 वर्षांत मोदी सरकारचं सर्वात मोठं कर्तृत्व म्हणजे त्यांनी केलेली लोकशाहीची हत्या! विरोधक संपवण्यासाठी आधी नेते फोडायचे, नेते नाही फुटले तर थेट पक्षच फोडायचा, खासदार-आमदार पळवायचे, हाच यांचा धंदा. - वर्षा गायकवाड, खासदार, काँग्रेस
.
#VarshaGaikwad #LokSabha #BJP #ShivsenaUBT #SatyaprabhaNews LatestNews
  • मुख्यमंत्रीपदावर डोळा ठेवून ईर्ष्या चालली आहे. दिल्लीला जात आहेत, परत निराश होऊन येत आहेत. फडणवीस साहेब सहज हलतील का बाजूला? कुणाला तरी शह देण्यासाठी आमची ताकद कमी करायची आणि माझी ताकद वाढवून दाखवून दिल्लीसमोर जायचं आणि दाखवायचं की आता मी मुख्यमंत्री होऊ शकतो अस अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. : - संजय पवार, उपनेते (शिवसेना ठाकरे गट)
#SanjayPawar #DevendraFadnavis #Maharashtra #LatestNews  #SatyaprabhaNews
  • उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदार कुठे जातायत आणि का जातायत, याच्याशी भाजपला काहीही देणंघेणं नाही. यात भाजपचा काहीही संबंध नाही - चंद्रशेखर बावनकुळे
#ChandrashekharBavankule #udhhavthakeray #SatyaprabhaNews #bjp #ShivsenaUBT MarathiNews PoliticalNews
  • लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं... हा अत्यंत किळसवाणा राजकीय व्यभिचार असून संविधान व लोकशाही मोडून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु असल्याचं हे लक्षण आहे. याला ‘ऑपरेशन टायगर’ नाही ‘ऑपरेशन बाजार’ म्हणावं लागेल आणि हा ‘ऑपरेशन बाजार’ लायकीचा, माणसांचा की विचारांचा हे लोकंच ठरवतील. - रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी (शप)
#RohitPawar #Shivsena #Maharashtra #SatyaprabhaNews #OperationTiger MaharashtraPolitics
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026

Recent News

image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज