• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, June 27, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

एकही बाधित व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये : पालकमंत्री अब्दुल सत्तार

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
3 September 2024
in Top News, किनवट, महाराष्ट्र
image editor output image 1912214882 1725359366919
34
SHARES
227
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश

    हिंगोली दि.03: जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणावर नदी-नाले काठावरील गावे, शेतीपिकांचे आणि रस्ते, पूल बाधित झाले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने योग्य समन्वय ठेवून तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करावेत. यामध्ये एकही बाधित व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश अल्पसंख्यांक विकास, औकाफ, पणन मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा प्रशासनाला आज दिले.
    पालकमंत्री दोन दिवसांच्या हिंगोली ‍जिल्हा दौऱ्यावर आले असता, आज सकाळीच कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव, डोंगरगाव पुल आणि हिंगोली तालुक्यातील सावरखेडा आणि आडगाव तसेच हिंगोली शहरातील बांगर नगर व आजम कॉलनी येथे पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
    यावेळी आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) संजय कुलकर्णी, उप विभागीय अधिकारी समाधान घुटूकडे, प्रतीक्षा भुते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांच्यासह विविध यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते.
    सद्यस्थितीत प्रमाणापेक्षाही जास्त नुकसान झाले असून, जिल्ह्यातील नदी-नाले काठावरील शहरी आणि ग्रामीण भागाला याचा मोठा फटका बसला आहे. ग्रामीण भागातील शेतीपिकांसह गुरे-ढोरे, पशुधन, दुभती जनावरे वाहून गेली आहेत. पुराच्या पाण्याने रस्ते आणि पुलांचे भाग तुटल्यामुळे गावांचा संपर्कही तुटला आहे. त्यामुळे तो तातडीने पूर्ववत करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. सत्तार यांनी जिल्हा यंत्रणेला दिले.
    पुराच्या पाण्यामुळे वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांचे खांब पडले असून, हा वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करावा. तसेच पूरग्रस्त भागात साथीचे रोग पसरण्याची भिती असून, त्यासाठी आरोग्य विभाग आणि पशुसंवर्धन विभागाने पावसामुळे होणाऱ्या साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्याचे काम करावे. तसेच पशुधन वाचविण्यासाठी तातडीने खबरदारीच्या उपाययोजना करताना लसीकरणाला प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. नुकसान भरपाई देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेने योग्य समन्वय साधत तातडीने पंचनामे सुरू करावेत. या कामासाठी आवश्यकतेनुसार कृषि सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी व इतर तालुकास्तरीय अधिकारी-कर्मचारी यांची पथके गठीत करून पंचनामे कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

    पालक मंत्री अब्दुल सत्तार भर पावसात पोहचले शेतक-यांच्या बांधावर…

    जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत असून, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेत मंगळवारी सकाळीच शेतकऱ्यांच्या बांधावर भर पावसात पोहचत त्यांना धीर दिला.
    हिंगोली तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या गावातील शेतकऱ्यांना पालकमंत्री श्री. सत्तार यांनी भेट देत धीर दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राज्य शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, अतिवृष्टीने झालेली नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. काळजी करू नका, राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून निधी मिळविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या शासन निर्णयानुसार प्रयत्न करणार असल्याचा त्यांनी विश्वास दिला.
    सर्वांनी एकत्रित येऊन सर्व यंत्रणेने मदत करावी. अस्मानी संकटाचा मुकाबला करताना सर्वांना एकजुटीने काम करावे लागणार आहे. यामध्ये सर्व विभागाच्या योग्य समन्वयातून तातडीने मार्ग काढण्यात येईल. पशुधन आणि शेती तसेच पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यांना राज्य शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. येणाऱ्या कालावधीत अतिवृष्टी बाधित भागांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर वस्तुनिष्ठ आकडेवारी समोर येईल. त्यानुसार मदत देणे सोईचे होणार असल्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

    #सत्यप्रभा न्युज #नांदेड


    Previous Post

    धर्माबाद शहर नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल ७१ कोटी ५८ लक्ष रुपयाचा निधी मंजूर.

    Next Post

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    Next Post
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला...; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    Stay Connected

    • 327k Fans
    • 4.3k Followers
    • 1.2k Subscribers
    ADVERTISEMENT

    Instagram

    • मागील अनेक वर्षांनंतर वॉर्ड क्र. १६ मध्ये घरपोच कचरा संकलन सेवा पुन्हा सुरू; डॉ. कैलाश भानुदास यादव यांच्या पाठपुराव्याला अखेर यशनांदेड दि२६ जून: नांदेड महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक १६ मधील नागरिकांना गेल्या सहा वर्षांपासून भेडसावत असलेल्या घरपोच कचरा संकलनाच्या समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे. डॉ. कैलाश भानुदास यादव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत वॉर्डात घरगुती कचरा संकलनासाठी हातगाड्या (हातरिक्षा) पुन्हा सुरू करण्यात आल्या. या निर्णयामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून परिसरातील स्वच्छता व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. वॉर्ड क्रमांक १६ मध्ये घरपोच कचरा संकलन सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता....http://www.satyaprabhanews.com/after-many-years-household-waste-collection-service-has-been-started-again-in-ward-no-16/12745/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
    • हदगाव पंचायत समिती बनली ‘घाणीचे साम्राज्य’ गटविकास अधिकाऱ्याची दुर्लक्ष…शौचालयातील दुर्गंधीमुळे नागरिकांची पळता भुई थोडी; भिंतीवर रंगल्या
    • भाजपला अंगावर घेणे आणि सत्तेतून खाली खेचणे हैं आंबेडकरी चळवळी शिवाय दुसरे कोणी करू शकत नाही.
#PrakashAmbedkar #VBA #BJP #MarathiNews #SatyaprabhaNews
    • शेवटच्या श्वासापर्यंत लढणार!
नवनीत राणा पुन्हा मैदानात उतरणार!
.
#SatyaprabhaNews  #NavneetRana #Amravati
    • संतापाच्या भरात तोंडातून एखादा अपशब्द निघणे आणि
    • भाजप संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविरोधात केलेल्या धमकीवजा वक्तव्यांवरून कारवाई करणार का, हे पाहावे लागेल. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी खासदारपदाचा राजीनामा द्यावा आणि निवडणूक लढवावी.
#SatyaprabhaNews #SanjayPatil #AdityaThackeray #BreakingNews #MarathiNews
    • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
    • घाबरलेले संजय दिना पाटील मानसिक संतुलन ढासळल्यासारखे करत असतील तर याची जबाबदारी सरकारने घ्यावी. त्याचा भुर्दंड पत्रकारांनी का भरावा? : सुषमा अंधारे, उपनेत्या, शिवसेना ठाकरे गट
.
#SushmaAndhare #SatyaprabhaNews #SanjayDinaPatil #MaharashtraPolitics #MarathiNews
    • Sanjay Raut on Sanjay Dina Patil : पत्रकारांना धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा.
.
#sanjayraut #sanjaydinapatil #SatyaprabhaNews #shivsena #eknathshinde
    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    IMG 20260624 183341

    आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

    24 June 2026
    image editor output image460745060 1782109764423

    नांदेड विधान परिषद निवडणुकीत खासदार आष्टीकरांना मोठा धक्का आणि मुलगा कृष्णाचा दारुण पराभव !

    22 June 2026
    Fathers Day

    बाप नावाचा अथांग महासागर…

    21 June 2026
    image editor output image 403175914 1781548284491 1

    आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

    16 June 2026

    Recent News

    IMG 20260624 183341

    आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

    24 June 2026
    image editor output image460745060 1782109764423

    नांदेड विधान परिषद निवडणुकीत खासदार आष्टीकरांना मोठा धक्का आणि मुलगा कृष्णाचा दारुण पराभव !

    22 June 2026
    Fathers Day

    बाप नावाचा अथांग महासागर…

    21 June 2026
    image editor output image 403175914 1781548284491 1

    आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

    16 June 2026

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    IMG 20260624 183341

    आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

    24 June 2026
    image editor output image460745060 1782109764423

    नांदेड विधान परिषद निवडणुकीत खासदार आष्टीकरांना मोठा धक्का आणि मुलगा कृष्णाचा दारुण पराभव !

    22 June 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज