धर्माबाद ता.प्र.दत्तात्रय सज्जन दि.१६ :- अवघ्या काही महिण्यापुर्वी धर्माबाद पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झालेल्या प्रियंका गजाननराव पवार यांना गोंदिया जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विशेष पदक पुरस्कार ह्या पूर्वीच घोषित करण्यात आला होता, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ह्या पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते व पोलीस अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले आहे.
धर्माबाद पोलीस स्टेशन येथे येण्यापूर्वी प्रियंका गजाननराव पवार यांनी गोंदिया ह्या नक्षलग्रस्त भागात २०२० ते २०२३ पर्यंत त्यांनी आपली कर्त्यव्य यशस्वीरित्या पार पाडत भरीव कामगिरी केली होती, त्यांच्या ह्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी विशेष सेवा पदक जाहीर केले होते.
पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गजाननराव पवार ह्या हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पळशी ह्या गावच्या रहिवाशी असून त्यांनी गोंदिया त्या नंतर हिंगोली येथे उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
धर्माबाद पोलीस स्टेशन येथे पवार मॅडम ह्या चालु वर्षातील फेब्रुवारी महिन्यात रुजू झाल्या असून अत्यंत शांत स्वभावाच्या असलेल्या प्रियंका पवार यांची कामाप्रति असलेली निष्ठा हेच त्यांच्या यशाच गमक आहे. पोलीस स्टेशन हद्दीतील विविध घटना, गुन्हे, स्त्री अत्याचार संबंधी गुन्हे असो कि अल्पवयिन मुलींचे योग्य असे समुपदेशन असो त्यांनी सर्वच बाबतीत आपली छाप सोडली आहेत.
गोंदिया जिल्ह्यात केलेल्या उत्तम कामगिरीसाठी दि. १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते विशेष पदक प्रदान करण्यात आले आहे. ह्या कार्यक्रमास अतिथी म्हणून विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांची उपस्थिती होती, ह्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रियंका पवार यांना सदरचे विशेष पदक देण्यात आले आहे, त्यांच्या ह्या पदक प्राप्तीबद्दल धर्माबाद उपविभागिय पोलीस अधिकारी प्रशांत संपते, धर्माबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पदक प्रदान केल्याची माहिती मिळताच तालुक्यातील नागरिकांकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड












