Pune Police Guidelines to Lodge Owners : पुण्यातील लॉजचे मालक आणि चालक यांना पुणे पोलिसांनी(Pune News) चार महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. लॉज (Pune Lodge) येथे रहावयास येणारे सर्व ग्राहकांची कागदपत्रे व्यवस्थितपणे तपासून रजिस्टरमध्ये नोंद करा अशी महत्त्वाची सूचना पोलिसांनी लॉजचे मालक- चालक यांना केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील लॉजचे मालक- चालक यांची बैठक घेण्यात आली.
पुणे पोलिसांच्या(Pune Police) परिमंडळ ५ कडून हद्दीतील लॉज मालक आणि अधिकारी यांची बैठक झाली. लॉजवर राहावयास येणारे परदेशीय नागरिक यांचे सी फॉर्म भरून त्यांचे पासपोर्ट व व्हिजा यांच्या छायांकित प्रति घेऊन रजिस्टरला नोंद करावी अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. लॉजचे प्रवेशद्वारावर व सभोवती येणारे जाणारे रस्ते कव्हर होतील अशा पद्धतीने एचडी व नाईट विजन कॅमेरे बसवण्यात यावेत अशा सुद्धा सूचना पोलिसांनी दिल्या. लॉज मध्ये संशयित इसम आढळून आल्यास तात्काळ पोलीस कंट्रोल रुमला कळवा, असेही पोलिसांनी सांगितलेय.
पुणे पोलिसांच्या परिमंडळ 500 पोलीस उपयुक्त राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात या अंतर्गत येणाऱ्या सर्व लॉज च्या मालक आणि चालक यांच्यासोबत काल आम्ही बैठक घेतली. या बैठकीत आम्ही त्यांना काही मार्गदर्शक सूचना जर त्यांनी पाळणा बंधनकारक आहे याबाबत माहिती दिली. त्यांच्या लॉज मध्ये येणारे सर्व नागरिकांची कागदपत्र तपासूनच त्यांना प्रवेश द्यावा तसेच परदेशी नागरिकांच्या प्रवेशाबद्दल सुद्धा त्यांचे सर्व कागदपत्र आणि पासपोर्ट सोबत असलेला विजा याची पडताळणी करून घेतल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जाईल याची खात्री करावी.”