विजय पाटील
छत्रपती संभाजी नगर दि.२०: बनेवाडीतील जमीन रेल्वेची असून, अनधिकृतरीत्या तिचा कब्जा केल्याचे सांगत दक्षिण मध्य रेल्वेने बनेवाडीतील नागरिकांना एक महिन्यात घरे खाली करण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे हादरलेल्या रहिवाशांनी शनिवारी (१९ एप्रिल) रेल्वेस्टेशनच्या प्रवेशद्वारात ठिय्या मांडला. खासदार डॉ. भागवत कराड यांच्याकडे न्याय देण्याची मागणी केली.
काय आहे प्रकरण…
बनेवाडीतील रहिवाशांना १ फेब्रुवारीला रेल्वेकडून जमीन खाली करण्याची नोटीस आली आहे. पुरावे असल्यास दक्षिण मध्य रेल्वेच्या कार्यालयात घेऊन येण्यास सांगितले होते. या नोटिसीमुळे काही नागरिकांनी कागदपत्रे जमा केली. मात्र ८ एप्रिलला दुसरी नोटीस बजावण्यात आली. त्यात महिनाभरात जमीन खाली करण्यास सांगितले आहे. त्यामुळे रहिवाशी हादरून गेले. खासदार डॉ. भागवत कराड हे शनिवारी रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे कळताच रहिवाशांनी रेल्वेस्टेशनच्या नव्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर ठाण मांडले. त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन डॉ. कराड त्यांना भेटायला आले. यावेळी अश्रू अनावर झालेल्या महिलांनी त्यांना सांगितले, की आम्ही ५४ वर्षांपासून बनेवाडीत राहत आहोत. घरे हिरावू नका… त्यावर लवकरच पाहणीसाठी बनेवाडीत येतो, असे आश्वासन डॉ. कराड यांनी दिले. यावेळी एका महिलेने थेट डॉ. कराड यांचे पाय धरले होते
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!