अंबाजोगाई दि.१०: संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेशासोबतच अहिंसेच्या मार्ग दाखवणाऱ्या भगवान श्री महावीर यांच्या जयंतीनिमित्त आज अंबाजोगाई शहरात निघालेल्या भगवान श्री महावीर यांच्या भव्यदिव्य अशा मिरवणुकी दरम्यान महावीर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन शहरातील सर्व जैन बांधवांस भगवान श्री महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.या मिरवणुकीत अंबाजोगाई शहरातील सर्व जैन महिला व पुरुष पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते.
याप्रसंगी राजकिशोर मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की जगाला अशांती व हिंसेच्या प्रवृत्ती पासून दूर नेण्यासाठी भगवान श्री महावीर यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांच्या आई वडीलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी ध्यान धारणा व तपस्या प्रारंभ केली. त्यानंतर धर्म व अहिंसा याचा प्रचार जगभर केला. वयाच्या ७२ व्या वर्षी महावीरांचे निधन झाले. जैन बांधव हे भगवान श्री महावीर यांच्या जन्म व निधनाच्या दिवशी घरोघरी दिवे लावतात. भगवान महावीर म्हणतात की, कळत नकळत देखील आपल्या हातून कोणाची हिंसा होणे हे अयोग्य आहे. त्याशिवाय दुसऱ्याच्या मार्फतही कोणाची हिंसा घडवून आणू नये किंवा कुठल्याही जीवांना मन, शरीर किंवा बोलण्याने दंडित करू नये अशी भगवान श्री महावीरांची शिकवण असल्याचे मोदी यांनी नमूद केले. सर्वांच्या आत एकच आत्मा आहे. आपल्या प्रमाणेच प्रत्येक प्राण्यांना आपापले प्राण प्रिय आहे त्यामुळेच कोणत्याही प्राण्यांप्रति हिंसा करू नये, स्वतः हिंसा करणारा, दुसऱ्यांकडून हिंसा घडवून आणणारा व दुसऱ्याने केलेल्या हिंसेचे समर्थन करणारा स्वतः प्रत्ति द्वेष वाढवत असतो असेही भगवान श्री महावीरांचे मत होते अशी स्पस्टोक्ती राजकिशोर मोदी यांनी यादरम्यान दिली. सध्या सर्वत्र राजकीय तथा सामाजिक दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा वातावरणात भगवान श्री महावीरांची शांती तथा अहिंसेची शिकवण खऱ्या अर्थाने उपयोगी पडणार असल्याचे परखड मत राजकिशोर मोदी यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
आपल्या स्वतःविषयी असणारा भाव अन्य प्राण्यांविषयी देखील असू द्यावा. सर्व प्राणिमात्रांविषयी अहिंसेचा भाव राखा. मन, वाणी आणि शरीराने कोणाचीही हिंसा न करणारा खरा संयमी म्हणून गणला जातो असे भगवान श्री महावीर म्हणत असत. स्वतःची पूर्ण खात्री झाल्याशिवाय, पाहिल्या व विचार केल्याशिवाय कृती करणाऱ्याकडून कळत नकळत हिंसा करतो असे भगवान श्री महावीर यांचे मत होते. दुःखास सर्वच जीव घाबरत असतात हे लक्षात घेऊन कोणत्याही जीवास कष्ट देणे किंवा ईजा पोचवणे टाळावे अशी शिकवण भगवान श्री महावीर आपल्या प्रत्येक प्रवचनातून देत असत असेही मत राजकिशोर मोदी यांनी यावेळी व्यक्त केले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड #अंबाजोगाई