हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे | विजया दशमी दसरा निमित्ताने दरवर्षी शहरात बजरंग दल विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने आयोजित 51 फुटाच्या रावणाचे दहन एका लहान मुलाच्या हाताने व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित दि 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 8 वाजता श्री परमेश्वर मंदिर देवस्थान परिसरातील बस स्टॅन्ड येथे होणार आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे की मागील पंधरा ते वीस वर्षापासून सुरू असलेली रावण दहनाचे परंपरा या वर्षी पण कायम ठेवत बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने विजया दशमी दसरा निमित्ताने 51 फुटाच्या रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो या वर्षी विजया दशमी दसरा निमित्ताने 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 8 वाजता फटाक्यांच्या आतषबाजीने बस स्टँड परिसरात 51 फुटाच्या रावणाचे दहन शहरातील एका लहान मुलाच्या हाताने करण्यात येते हा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी हिमायतनगर शहरासह तालुक्यातील नवतरुण युवकासह नागरिकांनी यावे असे आवहान बजरंग दल शाखा वाढोणा तर्फे करण्यात आले आहे…