नादेड दि.२५:स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव यांनी कामाची दखल घेऊन ग्रामीण भागातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील वृत्तपत्रविद्या विभाग प्रमुख डॉ. बालाजी लक्ष्मणराव शिंदे यांची बहि:शाल शिक्षण केंद्र सल्लागार समितीवर सदस्य म्हणून निवड केली. डॉ. शिंदे यांना सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम पाहत आहेत. त्यांना दहा वर्षापेक्षा जास्त अनुभव असून ते राष्ट्रीय सेवा योजना योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणूनही काम करीत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे सचिव कृष्णा शिवाजीराव दळणर, प्राचार्य विठ्ठल डुमनर, डॉ. राजेंद्र गोणारकर आदींनी अभिनंदन केले.

#सत्यप्रभा न्यूज #नांदेड