
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-शहरातील जागरूक देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटी कडून नेहमी नाविन्य उपक्रम राबवले जातात या मंदिरात चे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ यांच्या संकल्पनेतून यावर्षी हिमायतनगर शहरातील गोरगरीब नागरिकांच्या एक ते दहा वर्ष वयोगटातील मुला-मुलींना दिवाळीनिमित्त श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटी कडून आज दि 8 नोव्हेंबर रोजी ड्रेसचे वाटप करण्यात आले आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे की तेलंगणा, आंध्रप्रदेश सह मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थानची आख्यायिका शहरासह नांदेड जिल्ह्यात नावलौकिक आहे या परमेश्वर मंदिर कमिटी कडून शहरातील गरजू रुग्णांना अल्प दरामध्ये रुग्णवाहिका मंदिर कमिटी कडून सुरू करण्यात आली आहे असाच एक नवीन उपक्रम म्हणून मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ यांनी सर्व मंदिर कमिटीच्या संचालक मंडळाची बैठक घेऊन यावर्षी दीपावली निमित्त शहरातील गोरगरीब नागरिकांच्या मुला-मुलींना मंदिर कमिटी कडून ड्रेसचे वाटप करण्याचा संकल्प केला होता त्या संकल्पनेची पूर्तता म्हणून आज दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सकाळी श्री परमेश्वर मंदिर येथे शहरातील 500 गरजवंत विद्यार्थ्यांना मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर सेठ श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते ड्रेसेस वाटप करण्यात आले यावेळी मंदिर कमिटीचे सर्व संचालक व विश्वस्त मंडळ व कर्मचारी उपस्थित होते….