तुषार कांबळे ! हदगाव प्रतिनिधी !
विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी वाढावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि पीडित, अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय देण्याचे काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन दि. १७ जून रोजी मंगळवारी मल्लिनाथ हॉटेल कवठा येथील सभागृहात करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर आणि कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्वराज्य पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर राहणार आहेत.
गुणवंत विद्यार्थी श्रेयश नवनित देशमुख, श्रीगणेश जयवंतराव देवसरकर, तन्वी विठ्ठल जाधव, कृतिका गजानन सुर्यवंशी, पल्लवी सुर्यभान मोरे, वैष्णवी गजानन सुर्यवंशी, मोहिणी विठ्ठलराव देवसरकर, लखन बालाजी भालेराव, वैष्णवी तुकाराम देवसरकर, सय्यद शगुफा मन्सुर, स्नेहल विश्वनाथ तवर, तृप्ती गजानन दुगाळे, दिशा दत्तराव कदम, निखील विलास पांडे, प्रथमेश सुरेश कंठाळे, लखन बालाजी भालेराव या विद्यार्थ्यांसह

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तातुजी देशमुख प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, मा.जि.प. सदस्य रमेश पाटील घंटलवार हे उपस्थित राहणार आहेत. तर माजी पंचायत समिती सभापती बालासाहेब कदम, तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
गुणवंत विद्यार्थी श्रेयश नवनित देशमुख, श्रीगणेश जयवंतराव देवसरकर, तन्वी विठ्ठल जाधव, कृतिका गजानन सुर्यवंशी, पल्लवी सुर्यभान मोरे, वैष्णवी गजानन सुर्यवंशी, मोहिणी विठ्ठलराव देवसरकर, रोहिणी गजानन माने, भाग्यश्री साहेबराव शिरफुले, लखन बालाजी भालेराव, वैष्णवी तुकाराम देवसरकर, सय्यद शगुफा मन्सुर, स्नेहल विश्वनाथ तवर, तृप्ती गजानन दुगाळे, दिशा दत्तराव कदम, निखील विलास पांडे, प्रथमेश सुरेश कंठाळे, लखन बालाजी भालेराव यांच्यासह विशेष यश संपादन केलेले अशिष हिरामन कदम नर्सिंग ऑफिसर म्हणून देशात पहिला येणारा विद्यार्थी, अच्युत अरुणराव देवसरकर (नांदेड पोलिस दल) योगेश माधवराव सुर्यवंशी (असिस्टंट सब इन्स्पेक्टर, फार्मास्टिक सी.आर.पी.एफ.) महारुद्र गोपाळराव वानखेडे (यवतमाळ, पोलिस दल) यांचाही गौरव करण्यात येणार आहे.
याशिवाय सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केलेले सोपानराव नेव्हल पाटील, नांदेड, सोपानराव जाधव सर, बोरगाव, निवृत्ती वानखेडे मानवाडीकर, गट शिक्षण अधिकारी किशन फोले, भाजपचे हदगाव तालुका मंडळ अध्यक्ष भागवत देवसरकर, आषिश देवसरकर युवा सेना सरचिटणीस हदगाव, (श्री. सुभाष सुगर प्रा.लि. चे जनरल मॅनेजर राजेशजी मानधना, पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगीरी बद्दल पंडीतरावजी पतंगे, यादव सुकापुरे, गौतम वाठोरे, गजानन जिद्देवार, यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच रिल्सस्टार अवधूत पऊळ (तालंग), उमेश शिंदे (उंचेगाव), विशाल मोरे (तालंग), ऋषी कदम (निवघा बाजार) यांचा सन्मान व गौरव करण्यात येणार असल्याचे या कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते अभिजीत देवसरकर यांनी माहिती दिली.
##सत्यप्रभा न्यूज नांदेड##