पोलिसांच्या समोर कॉपी बहाद्दरांची एका ग्रामपंचायत सदस्यांच्या जीवावर सेंटरवर दादागिरी.
नांदेड दि.२९: किनवट तालुक्यातल्यातील इस्लापूर येथील कै.प्रल्हादरावजी गरुड माध्यमिक व उच्च माध्यमिक सेंटर वर भर दिवसा 12 वी च्या पेपर मध्ये कॉफ्यांचा सुळसुळाट सुरू. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अनेक परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने नजर ठेवून होते मात्र इस्लापूर येथील संत ज्ञानेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय व कै.प्रल्हादरावजी गरुड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 12 वी परीक्षेच्या परीक्षा केंद्रावर आज दि 29 फेब्रुवारी रोजी दुपारी विज्ञान शाखेच्या पेपर मध्ये येथील एका ग्रामपंचायत सदस्यांच्या जीवावर सेंटरवर दादागिरी करत सर्रासपणे कॉप्यांचा सुळसुळाट सुरू आहे. नांदेड येथील शिक्षण विभागाने या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन.या कॉपीयुक्त परीक्षा सेंटर वर कारवाई करून हे सेंटर कायमचे बंद करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे
#सत्यप्रभा न्युज #नांदेड