
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देशवासीयांसाठी दैवतासमान आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ज्या महाड येथील चवदार तळ्याजवळ बाबासाहेबांनी शोषित- वंचितांच्या समान अधिकारांसाठी सत्याग्रह केला त्या चवदार तळ्याजवळच वंदनीय बाबासाहेबांचे छायाचित्र फाडले ही बाब अतिशय निंदनीय व संताप जनक आहे या कृत्यातून जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सडक्या मानसिकतेचे आणि विकृतीचे प्रदर्शन केले आहे त्यामुळे हिमायतनगर शहरातील भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या उपस्थितीत आमदार जितेंद्र आव्हाडांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आज दि 30 मे रोजी श्री परमेश्वर मंदिर समोर त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत दहन करण्यात आले

या बाबत सविस्तर वृत्त असे की आ.जितेंद्र आव्हाड यांनी परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केलेला अपमान भारतीय जनता पार्टी व या देशातील जनता कधीही विसरणार नाही. या विकृत जितेंद्र आव्हाडांच्या संतापजनक कृतीबद्दल दि 31 मे रोज गुरुवारी संपूर्ण राज्यभरात भारतीय जनता पार्टी निषेध आंदोलन करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी यासाठी तीव्र आंदोलन करत आहेत हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान समोर आज सकाळी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारत त्यांचे दहन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल, उपाध्यक्ष रुपेश नाईक, शहराध्यक्ष विपुल दंडेवाड, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष लक्ष्मण डांगे, शिवसेना शिंदेगट शहराध्यक्ष गजानन हारडपकर,युवा मोर्चा शहराध्यक्ष शितल सेवनकर , सुधाकर चिट्टेवाड, गजानन पिंपळे ,परमेश्वर नागेवाड ,ओमकार चरलेवार, विशाल शिंदे, बालाजी ढोणे सह भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्यूज #हिमायतनगर #नांदेड