• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, June 17, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतीम टप्यात ९६ टेबलवर नांदेडमध्ये होणार मतमोजणी

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
1 June 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
IMG 20240601 WA0004 1
32
SHARES
215
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.१ : ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी नांदेड जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील शासकीय तंत्रनिकेतन परिसरात सर्व मतयंत्र स्ट्रॉंगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले असून याच ठिकाणी मतमोजणी सकाळी आठ वाजता पासून सुरू होणार आहे.

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व त्यांच्या अधिनस्त वरिष्ठ अधिकारी यासंदर्भात दररोज आढावा बैठक घेत असून सोमवारी दुपारपर्यंत सर्व पायाभूत सुविधा या ठिकाणी पूर्णतः कार्यरत होणार आहे.मतमोजणी करताना आवश्यक असणारा राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग, माध्यमांचा सहभाग, निवडणूक निरीक्षक आणि भारत निवडणूक आयोगाला तातडीने देण्यात येणारी माहिती, यासाठी आवश्यक पूरक तांत्रिक व भौतिक यंत्रणा या परिसरात तयार करण्यात येत आहे. सध्या शासकीय तंत्रनिकेतन, बाबानगर, नांदेड येथे असणाऱ्या स्ट्रॉंग रूमसाठी तीन स्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात आहे. प्रवेशिका व तपासणी प्रक्रियेशिवाय या ठिकाणी कोणालाही प्रवेश नाही. दर्शनी भागात सहा स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही कॅमेरे 24 तास सुरू असतात. मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून या ठिकाणी सील लावण्यात आले आहे. स्ट्रॉंग रूममध्ये कोणालाही प्रवेश नसतो. तसेच २४ तास कॅमेऱ्याच्या माध्यमातून निगराणी केली जाते.

५०० कर्मचारी नियुक्त
मतदान प्रक्रियेच्या तुलनेत मतमोजणी प्रक्रियेसाठी कमी कर्मचारी लागतात. मात्र जवळपास 500 कर्मचारी आतमध्ये या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी असतील. तेवढेच पोलीस अधिकारी कर्मचारी सुरक्षा यंत्रणे संदर्भात काम करणार आहे.

८ वाजता मतमोजणीला प्रारंभ सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. प्रथम पोस्टल बॅलेट पेपर व या वर्षी घरी जाऊन घेण्यात आलेल्या ज्येष्ठांच्या मतदानाची मोजणी होणार आहे. त्यानंतर एकाच वेळी सहा मतदारसंघातील मतमोजणीला प्रारंभ होईल. साधारणतः साडेदहा ते अकराच्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल अपेक्षित आहे.

मतमोजणी संदर्भातील प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या निर्देशित सूत्रानुसार व सूचनेनुसार चालते यासाठी निवडणूक विभागाकडून नेमणूक करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डोळ्यात तेल घालून संपूर्ण यंत्रणेकडून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाचे पालन करीत मतमोजणी प्रक्रिया पार पाडतात. 4 जूनच्या सायंकाळपर्यंत सर्व फेऱ्यांची मतमोजणी पार पडण्याची शक्यता आहे.

किती टेबलवर मतमोजणी होणार ?

नांदेड जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्र आहेत. एका विधानसभा साठी 14 टेबल असे एकूण 84 टेबलवर मतमोजणी होणार आहे. याशिवाय पोस्टल बॅलेटसाठी १२ टेबल आहेत. थोडक्यात नांदेड जिल्ह्याची मतमोजणी 96 टेबलवर होणार आहे.

कोण करते मतमोजणी?

प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी असतात.यामध्ये मायक्रो ऑब्झर्वर म्हणजे सूक्ष्म निरीक्षक , दुसरे सुपरवायझर म्हणजे मतमोजणी पर्यवेक्षक, तिसरा काउंटिंग असिटंट म्हणजे मतमोजणी सहाय्यक आणि चौथा असतो एक शिपाई. सहाय्य करण्यासाठी. या प्रत्येक पदाचे जवळपास प्रत्येकी१०० कर्मचारी कार्यरत असतात.
यामधील सूक्ष्म निरीक्षक हे बँकेचे कर्मचारी असतात. सुपरवायझर हे साधारणतः अभियंते असतात. हिशेब ठेवण्यासाठी लागणारे मतमोजणी सहाय्यक महसूल विभागाचे तलाठी असतात व यांना पेट्या वगैरे आणून देण्यासाठी प्रत्येक टेबलवर एक शिपाई तैनात केला असतो.

एकूण फेऱ्या कशा ठरतात?

प्रत्येक विधानसभा क्षेत्रात किती केंद्र आहे त्याला भागीले टेबलची संख्या यावरून फेऱ्या ठरतात. उदाहरणार्थ 87 नांदेड विधानसभा क्षेत्रात 312 मतदान केंद्र आहेत. त्यामुळे 312 भागीले 14. बरोबर 22.28 म्हणजे 23 फेऱ्या होतील.
थोडक्यात नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात कमी 23 तर सर्वात अधिक 26 फेऱ्यानंतर पूर्ण निकाल लागेल.

एका फेरीला किती वेळ लागेल..?

एका फेरीला साधारण अर्धा तास लागतो. मात्र मतमोजणी कर्मचाऱ्यांना पुढे पुढे सराव झाल्यामुळे त्यापेक्षा कमी वेळ लागतो.
नांदेडमध्ये साधारणतः आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीचा अंदाज निकाल दहा -साडेदहा पर्यंत येईल, असा अंदाज आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

हिमायतनगर शहरात आ.जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याचे भाजपा कडून दहन

Next Post

नांदेड पंचायत समितीला आयएसओ मानांकन जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती

Next Post
image editor output image1160756826 1717253533274

नांदेड पंचायत समितीला आयएसओ मानांकन जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदार कुठे जातायत आणि का जातायत, याच्याशी भाजपला काहीही देणंघेणं नाही. यात भाजपचा काहीही संबंध नाही - चंद्रशेखर बावनकुळे
#ChandrashekharBavankule #udhhavthakeray #SatyaprabhaNews #bjp #ShivsenaUBT MarathiNews PoliticalNews
  • लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं... हा अत्यंत किळसवाणा राजकीय व्यभिचार असून संविधान व लोकशाही मोडून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु असल्याचं हे लक्षण आहे. याला ‘ऑपरेशन टायगर’ नाही ‘ऑपरेशन बाजार’ म्हणावं लागेल आणि हा ‘ऑपरेशन बाजार’ लायकीचा, माणसांचा की विचारांचा हे लोकंच ठरवतील. - रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी (शप)
#RohitPawar #Shivsena #Maharashtra #SatyaprabhaNews #OperationTiger MaharashtraPolitics
  • 🚨 महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी खळबळजनक बातमी! 🚨राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, उद्धव ठाकरेंचे तब्बल ६ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे!
.
#MaharashtraPolitics #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray #PoliticalCrisis BreakingNews SatyaprabhaNews MarathiNews SatyaprabhaNews
  • ओमराजेंना मी सकाळी फोन केला, पण माझा फोन त्यांनी उचलला नाही. मग मी त्यांच्या पाठीशी भावासारखे, सावलीप्रमाणे सोबत असणाऱ्या आमदार कैलासदादा पाटील यांना फोन केला. ते म्हणाले, ताई मी दुसऱ्यांची गॅरंटी कशी देऊ, मी माझी गॅरंटी देऊ शकतो. त्यामुळे कैलास पाटलांच्या बोलण्यातील संधिग्धता बरीचशी बोलकी आहे. - सुषमा अंधारे, उपनेत्या, शिवसेना ठाकरे गट
#SushmaAndhare #OmrajeNimbalkar #MaharashtraPolitics #LatestNews  #SatyaprabhaNews
  • अखेर ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन
.
#UddhavThackeray #EknathShinde #MaharashtraPolitics #Shivsena #SatyaprabhaNews
  • ऑपरेशन टायगर सोपं नाही. आमच्यापर्यंत अशाप्रकारच्या कोणत्याही घडामोडींची अधिकृत माहिती नाही. आम्ही मीडियाच्या माध्यमातून पाहतोय, ऐकतोय. 16 जूनला रात्री मला 11.30 वाजता एका व्यक्तीने सांगितलं महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जातंय. मी म्हटलं भाव काय आहे? ते म्हणाले, भाव तोच आहे, 50-50 कोटी... - संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट
#SanjayRaut #Maharashtra #LatestNews #MarathiNews #SatyaprabhaNews
  • आरएसएसला नोंदणीची गरज नाही; हिंदू धर्मालाही नोंदणीची गरज नाही. आरएसएस ही कोणतीही गुप्त संस्था नाही. आम्ही संघाबद्दल लोकांना खुलेपणाने माहिती देतो. गेल्या १०० वर्षापासून सरकारला आरएसएसबद्दल माहिती आहे आणि त्यांनी आम्हाला नोंदणी करण्यास कधीही सांगितलेले नाही.
.
#MohanBhagwat #RSS #SatyaprabhaNews #LatestNews #MarathiNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • नीट पेपर फुटीसंदर्भात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनाम्यासाठी आम्ही 13 जूनपर्यंत अल्टिमेटम दिला होता. मात्र, त्यांनी राजीनामा दिला नसल्याने आम्ही 20 जूननंतर संपूर्ण देशात शांततेत आंदोलन करणार आहोत. ते आंदोलन धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय मागे घेतले जाणार नाही. आमची नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की त्यांनी याची दखल घ्यावी. माझ्यावर झालेला हल्ला हे देशातील बेरोजगारीचे उत्तम उदाहरण आहे. देशाच्या विद्यमान परिस्थितीला भाजप इतकीच काँग्रेस पण जबाबदार आहे.
- अभिजीत दिपके, संस्थापक (कॉक्रोच जनता पार्टी)
#AbhijitDipke #MarathiNews #LatestNews #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026

Recent News

image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज