IPL 2025 : आयपीएल 2025 ची सुरुवात झाल्यापासून सनरायजर्स हैद्राबादच्या फलंदाजीची क्रिकेट विश्वासह सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.हैद्राबादची फलंदाजी फार मजबूत आहे, अशा चर्चाही रंगल्या होत्या. पहिल्याच सामन्यात काव्या मारनच्य सनरायजर्सने राजस्थान रॉयल्स विरोधात 286 धावा ठोकल्या होत्या. (SunRisers Hyderabad)
त्यामुळे हैद्राबादचा संघ यावेळी 300 पार धावा करेल, असंही तज्ज्ञांसह चाहत्यांकडून बोललं जात होतं.मात्र, गेल्या दोन सामन्यांपासून हैद्राबादच्या वाघांचं मांजर झालंय. 300 पार धावा करणार म्हणत असताना काव्या मारनचे सनरायजर्स दोनदा ऑलऑऊट झाले आहेत.आयपीएलमध्ये आज (दि.30) हैद्राबादचा सामना दिल्लीशी सुरु आहे. या सामन्यात हैद्राबादचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना हैद्राबादने 18.4 षटकात सर्व विकेट्स गमावत 163 धावा केल्या आहेत.त्यामुळे हैद्राबादचा संघ दुसऱ्यांदा ऑल ऑऊट झालाय.(Kavya Maran)
300 पारची चर्चा सुरु असताना एसआरएच 200 पार धावसंख्या उभारणे देखील कठिण झाले आहे. हैद्राबादकडून या सामन्यात अनिल वर्माने 74 धावा ठोकल्या तर हेन्री क्लासेनने 32 धावांचे योगदान दिले. अनिल वर्मा आणि हेन्री क्लासेन शिवाय इतर कोणालाही चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे हैद्राबादच्या वाघांचं मांजर झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगलीये.DC Vs SRH