
हिमायतनगर प्रतिनिधी/- हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार माधराव पाटील जवळगावकर यांनी आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी हिमायतनगर शहराचे ग्रामदैवत श्री परमेश्वर महाराज चरणी नतमस्तक होऊन आपल्या प्रचाराची सुरुवात केली व शहरातील बस स्टॅन्ड परिसरात असलेल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेचे हिंगोली लोकसभा विस्तारक कृष्णा पाटील आष्टीकर सह मित्र पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या संपर्क कार्यालयाचा शुभारंभ केला यावेळी बोलताना युवा सेनेचे कृष्णा पाटील आष्टीकर यांनी असे सांगितले की हिमायतनगर मतदारसंघाच्या विकासाची गती कायम ठेवायची असल्यास आमदार जवळगावकरांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे सांगितले


याबाबत सविस्तर वृत्त असे की हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असल्याने आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात आज श्री परमेश्वर मंदिर येथील देवस्थानचे दर्शन घेऊन केली आहे त्यांच्या प्रचाराच्या सुरुवातीला त्यांनी खेडो पाड्यांमध्ये जाऊन वाडी तांद्यातील नागरिकांचे शुभ आशीर्वाद घेतले व प्रत्येक गावात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले अनेक महिलांनी त्यांचे औक्षण करत त्यांच्या पदयात्रेला भरभरून असा प्रतिसाद दिला शहरातील मुख्य रस्त्यावरून निघालेल्या या पदयात्रेत ढोल ताशाच्या गजरात आमदार माधवराव पाटील जवळगावकर तुम आगे बढो ,हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत शेकडो नागरिक व तरुण कार्यकर्त्यांनी या प्रचार रॅलीमध्ये सहभाग नोंदविला होता सायंकाळच्या अंधारात सुद्धा मोबाईलच्या प्रकाशात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले असल्याचे पाहायला मिळाले यावेळी महाविकास आघाडीचे काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष गजानन सूर्यवंशी,शिवसेना तालुका प्रमुख विठ्ठल ठाकरे ,राष्ट्रवादीचे सरदार खान पठाण,माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड,प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद,माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण,माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, शहर अध्यक्ष संजय माने,प्रकाश रामदीनवार,योगेश चिल्कावार,पंडित ढोणे सह सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते