• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, May 19, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

आज मतमोजणी, प्रशासनाने केली जय्यत तयारी, मतमोजणी जिल्हाभरात कुठे कुठे होणार, काय काय नियम पाळावे लागणार वाचा

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
23 November 2024
in Top News, औरंगाबाद, महाराष्ट्र
image editor output image 322381086 1732325195889
32
SHARES
214
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

विजय पाटील
छत्रपती संभाजी नगर दि.२३ : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता उद्या, २३ नोव्‍हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्‍यादृष्टीने प्रशासनाने तयार पूर्ण केली आहे. मतमोजणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले. त्‍यांना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या.
श्री. स्वामी यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, टपालीमतपत्रिका नोडल अधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी यांनी मार्गदर्शन केले की, मतमोजणीसाठी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेच्या आधी मतमोजणी केंद्रावर उपस्थित रहावे. मतदान यंत्रे स्‍ट्राँगरूममधून बाहेर आणण्याआधी कुलूप सिल उघडताना निवडणूक निरीक्षक, उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असणे आवश्यक आहे. या प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रण करणे आवश्यक आहे. त्यामुळे आवश्यक ती पारदर्शकता जपता येते. मतमोजणी केंद्रावरील संवाद प्रणाली ही अद्ययावत व सुसज्ज ठेवावी. विद्युत पुरवठा अखंड ठेवण्याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे पथक सज्ज ठेवावे. मतमोजणीबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या तरतुदींचा अभ्यास करा. मतमोजणी कक्षात शांतता राखायला हवी. टपाली मतपत्रिकांची मोजणीने सुरुवात करा. मतमोजणी केंद्रावर अद्ययावत आरोग्य केंद्र सुसज्ज ठेवा. १०० मीटर कक्षेच्या आत वाहनांना परवानगी नाही. याबाबत दक्षता घ्यावी. मतमोजणी प्रक्रिया अचूक व पारदर्शक पद्धतीने राबवावी,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
मतमोजणी केंद्राची ठिकाणे
सिल्लोड : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर जळगाव हायवे, सिल्लोड
कन्नड : इनडोअर हॉल, शिवाजी महाविद्यालय, कन्नड, ता. कन्नड
फुलंब्री : गरवारे हायटेक फिल्म्स लि. चिकलठाणा एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर मध्य : शासकीय तंत्रनिकेतन , रेल्वेस्टेशन रोड, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर पश्चिम : शासकीय अभियांत्रिकी विद्यालय, रेल्वेस्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर पूर्व : सेंट फ्रान्सीस डी सेल्स हायस्कूल, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर
पैठण : प्रशासकीय इमारत, संतपीठ, जायकवाडी धरणाजवळ, पैठण
गंगापूर : इनडोअर स्टेडियम हॉल, श्री मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर, ता. गंगापूर
वैजापूर : टेनिस कोर्ट हॉल, विनायक पाटील महाविद्यालय, येवला रोड, वैजापूर

अशी केली तयारी…
इव्हीएमसाठी १२६ टेबल असतील. टपली मतपत्रिकांसाठी ७० टेबल असतील तर ईटीपीबीएससाठी १२ टेबल असतील, अशी माहिती देण्यात आली. ८५२ मतमोजणी कर्मचारी, २४२ सूक्ष्म निरीक्षक व ३००० पोलीस कर्मचारी असे ५७७८ मनुष्यबळ मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

मतदारसंघनिहाय होणाऱ्या मतमोजणीच्या फेऱ्या अशा…
सिल्लोड-२९, कन्नड-२७, फुलंब्री-२७, औरंगाबाद मध्य-२३, औरंगाबाद पश्चिम -२८, औरंगाबाद पूर्व-२४, पैठण-२६, गंगापूर-२७, वैजापूर-२६. मतमोजणी कालावधीत व मतमोजणी नंतरही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्‌भवू नये म्हणून पुरेसा पोलीस बंदोबस्त, केंद्रीय सुरक्षा बलांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. संवेदनशील भागात गस्त, ड्रोनद्वारे, सीसीटीव्हीद्वारे गस्त वाढविण्यात आली आहे. सद्यस्थितीत ६ केंद्रीय बल गट तर २ राज्य राखीव पोलीस बल गट जिल्ह्यात तैनात आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी दिली.

हे आदेश पाळावेच लागणार…
मतमोजणी शांततेत व्हावी यासाठी मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्याअन्वये मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्राधिकृत व्यक्‍तींव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्‍तीस प्रवेश करण्यास, मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हे आदेश मतमोजणी अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी यांना लागू राहणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. संपूर्ण परिसरात मोबाईल, टॅब, संगणक व तत्सम संदेशाची देवाणघेवाण करणाऱ्या विद्युत उपकरणे बाळगण्यास व हाताळण्यास मनाई, अनधिकृत व्यक्‍तीच्या प्रवेशास मनाई करण्यात आली असून या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्‍तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर

Previous Post

उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल ३६ उमेदवारांचे भवितव्य उघडणार मतपेटीतून

Next Post

जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून प्रतापराव पाटील यांची नियुक्ती करा :  इंजि .स्वप्निल इंगळे यांची मागणी

Next Post
image editor output image 160051611 1732446914819

जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून प्रतापराव पाटील यांची नियुक्ती करा :  इंजि .स्वप्निल इंगळे यांची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करत होतो. एखाद्या डोंगरखेड्यात जाऊन काही करता येईल का? तिथेच आपले चार खांदे शोधावेत आणि त्यांच्यासाठी काही करता येईल का असा विचार मनात आला होता.
.
#NanaPatekar #SatyaprabhaNews #BreakingNews #MarathiNews #bollywoodactor
  • महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी! दिनांक 19 ,20 व 21 मे 2026 रोजी कस्तुरी मंगल कार्यालयासमोर नांदेड रोड येथे भव्य दिव्य असा सर्व धर्मीय चतुर्थ पट्टाभीषेक सोहळा वर्धापन दिन साजरा करण्यात येत असून त्याची अतिशय भव्य अशी तयारी पूर्ण झाली. पंचक्रोशीतील सर्व गावकऱ्यांनी सढळ हाताने या कार्यक्रमास योगदान दिले असून त्यामुळे हा सोहळा अधिकच व्यापक आणि मोठ्या स्वरूपात संपन्न होत आहे. सकाळी शिवयोगी श्री बसवलिंग स्वामी संजीवन समाधी रुद्राभिषेक करून सुरुवात होणार असून रुद्र स्वाहाकार पंचकुंडी यज्ञ तसेच भव्य पारायण संकीर्तन व धर्म सभा, नगर भोजनाने हा सोहळा संपन्न होणार असून यासाठी उज्जैन जगद्गुरु श्री...http://www.satyaprabhanews.com/on-the-day-of-pattabhishek-vardhapan-organized-by-mahadev-math-sansthan-hadgaon/12418/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यात देशाच्या भविष्यासाठी समुद्रातून पाईपलाईनद्वारे थेट पेट्रोल-डिझेल आणता येईल का, याचे प्लॅनिंग करत आहेत. मात्र, काँग्रेस आणि महाआघाडीतील नेते त्यांच्यावर आरोप करत आहेत. - गोपीचंद पडळकर, भाजप, आमदार
.
#GopichandPadalkar #NarendraModi #SatyaprabhaNews #BJP #LatestNews
  • नीट पेपर फुटी प्रकरण: प्रा.शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात.पुण्याहून दिल्लीला हलवल्याची माहिती.
  • “डिझेल दरवाढीचा फटका; एसटी तिकीटदर वाढीचे संकेत, प्रताप सरनाईकांचे मोठे वक्तव्य”प्रताप सरनाईक यांनी वाढत्या डिझेल दरांमुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक ताण पडत असल्याचे सांगत तिकीटदर वाढीचे संकेत दिले आहेत. एसटीला दररोज सुमारे १० लाख ८७ हजार लिटर डिझेल लागते आणि दरवाढीमुळे दररोज ३३ लाख रुपयांहून अधिक अतिरिक्त भार सहन करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सरकारकडून विशेष मदत न मिळाल्यास पुढील १० ते १२ दिवसांत तिकीटदर वाढीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. मात्र विद्यार्थ्यांसह विविध प्रवासी सवलती कायम राहतील, अशी ग्वाही देण्यात आली आहे.दरम्यान, अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांवर कारवाई होणार असल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.#PratapSarnaik #STBus #DieselPriceHike #MaharashtraNews #SatyaprabhaNews
  • राज्य शासन आणि केंद्रसरकारने जर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सिरीयसली घेतले नाही तर नाशिकमधून दिल्लीला जाणारा रस्ता आम्ही बंद करणार म्हणजे करणार.
.
#RohitPawar #SatyaprabhaNews #farmer #BreakingNews #OnionRate
  • NEET 2024 ला पेपर लीक झाला. परीक्षा रद्द झाली नाही. मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. CBI चौकशी सुरू केली. एक समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर 2026 ला पेपर लीक झाला. परीक्षा रद्द झाली. मंत्र्यांनी पुन्हा राजीनामा दिला नाही. सीबीआय पुन्हा चौकशी करत आहे. आता आणखी एक समिती स्थापन केली जाईल.: राहुल गांधी
.
#SatyaprabhaNews  #RahulGandhi #NEET
  • Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग
.
#britainpm #KeirStarmer #SatyaprabhaNewshttp://www.satyaprabhanews.com/political-news-major-state-earthquake-prime-minister-ready-to-resign-state-earthquake-in-britain/12410/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • ओला, उबर, रॅपिडो बाईक टॅक्सी
ॲपवरील कारवाई स्थगित!
.
#SatyaprabhaNews #Bike #RapidoCaptain #biketaxi
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10438
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8168
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6268
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026
IMG 20260512 210505

पांदण व वहिवाट रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; आमदारांचे प्रशासनाला निर्देश.

12 May 2026

Recent News

IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026
IMG 20260512 210505

पांदण व वहिवाट रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; आमदारांचे प्रशासनाला निर्देश.

12 May 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज