मुंबई: न्याय हा सर्वांसाठी समान असेल तर मिळायला हवा. धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुरावे उपलब्ध नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. पण धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड याला कशाप्रकारे सरेंडर करायला लावले,याचे पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत, असा सनसनाटी दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला. हे प्रकरण अंगावर शेकणार, हे लक्षात येताच धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड (Walmik Karad) याला पद्धतशीरपणे जमा केला. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा कार्यकर्ता बालाजी तांदळे (Balaji Tandle) हा संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांनी आम्ही सर्व आरोपींना शोधले, असे सांगत होता. त्याने कोणाला सांगितले की, आरोपींना शोधण्यासाठी आमच्या 60-70 गाड्या फिरत होत्या. तर धनंजय देशमुख यांना तांदळेने सांगितले की, आमच्या 200 गाड्या आरोपींच्या शोधासाठी फिरत होत्या. मात्र, सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात बालाजी तांदळे आणि संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश नाही. त्यांचा सहआरोपी केले पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. त्या सोमवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
मी धनंजय देशमुख यांच्या नातेवाईकाशी बोलले तेव्हा मला बालाजी तांदळेविषयी समजले. आरोपींना पोलिसांनी नाही तर आम्ही शोधल्याचे बालाजी तांदळे त्यांना म्हणाला होता. त्यामुळे धनंजय मुंडे हे बालाजी तांदळे याच्यावर प्रचंड संतापले होते. धनंजय मुंडे हे बालाजी तांदळेला म्हणाले की, ‘तू जास्त बोलला म्हणून मला त्रास होतोय’. धनंजय मुंडे यांना सगळ्याची कल्पना होती, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.
संतोष देशमुख हत्याप्रकरण आपल्यावर शेकणार हे लक्षात येताच धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी आरोपींना शोधायला सुरुवात केली. हे सगळं प्रकरण वाल्मिक कराड याच्यावर शेकावे, आपल्यापर्यंत काही येऊ नये, असा धनंजय मुंडे यांचा प्रयत्न होता. त्यामुळे माझी मागणी आहे की, या सर्वांना सहआरोपी करा. सीआयडीच्या आरोपपत्रात वाल्मिक कराडला मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचं नाव नाही. आरोपपत्रातील 200 जणांच्या यादीतून संबंधित पोलीस अधिकारी आणि बालाजी तांदळे यांचे नाव आणि जबाब वगळण्यात आला आहे. यामध्ये एलसीबीचे अधिकारी गीत्ते यांचाही सहभाग असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला.
धनंजय मुंडेंसह 10 जणांना सहआरोपी करा, अंजली दमानियांची मागणी
संतोष देशमुख यांचे वाल्मिक कराडच्या सहकाऱ्यांनी अपहरण केले हे माहिती असूनही एलसीबीचे अधिकारी गीत्ते यांनी काहीच केले नाही. कायदा काय म्हणतो तर सकृतदर्शनी पुरावा असेल तर कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डॉ. वायबसे आणि त्यांची पत्नी,एसपी बारगळ, पीएसआय राजेश पाटील,पीआय भागवत शेलार,पीआय महाजन आणि गीते एलसीबीचे अधिकारी 10 जणांना सहआरोपी करुन जबाब नोंदवा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.
अंजली दमानियांचा शिंदे गटावर आरोप
कांदिवली परिसरातही सध्या असाच प्रकार सुरु आहे. लालसिंग राजपुरोहीत हा शिंदे गटाचा नेता गुंडगिरी करत आहे. माझ्यासोबत सध्या पै दाम्पत्य बसले आहे. याचं एक दुकान बळजबरीनं लाटण्यात आलंय. आदेश देऊनही त्याच्याविरोधात कारवाई होत नाही. माझी शिंदेंच्या शिवसेनेला विनंती आहे, की या गरीब कुटुंबाला त्यांचं दुकान परत मिळवून द्या. राजकीय गुंडगिरीला मुंबईदेखील अपवाद नाही, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.














Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me. https://accounts.binance.com/fr-AF/register-person?ref=JHQQKNKN
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!