विजय पाटील
वैजापूर दि.२६ :शिऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पाराळा (ता. वैजापूर) येथील महादेव ॲग्रो सर्व्हिसेस या खत दुकानावर कृषी विभागाने छापा मारून बनावट खताचा मोठा साठा जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) सायंकाळी करण्यात आली. दुकानमालक आकाश सोमनाथ जगताप (रा. पारळा, ता. वैजापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात खत निरीक्षक तथा पंचायत समितीचे कृषी अधिकारी जगदीप ज्ञानबा वाघमारे यांनी शिऊर पोलिसांत तक्रार दिली आहे. एका शेतकऱ्याने कृषी विभागाकडे बनावट खतविक्रीची तक्रार केली होती. त्यानुसार खत कंपन्यांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन खत निरीक्षक वाघमारे यांनी महादेव ॲग्रो सर्व्हिसेस दुकानावर छापा मारला. आकाश जगताप याने बनावट खते गोडावूनमध्ये ठेवली होती. गोडावूनमधून वेगवेगळ्या कंपन्यांच्या ५५ गोण्या (किंमत ९१ हजार ८९० रुपये) जप्त केल्या. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन ओगळे करत आहेत.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!