• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, July 1, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र औरंगाबाद

वेरुळ अजिंठा महोत्सव: फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस पर्वणी ! राहुल देशपांडे, प्रियंका बर्वे, कैलाश खेर, श्रेया घोषालची हजेरी !!

Satyaprabha News by Satyaprabha News
12 January 2024
in औरंगाबाद, महाराष्ट्र
38
SHARES
251
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

img 20240112 2339092520059421775857212

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी ! विजय पाटील !
दि : १२/०१/२०२४
जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी राबविण्यात येणारा वेरुळ अजिंठा महोत्सव यंदा दि.२, ३ व ४ फेब्रुवारी रोजी सोनेरी महाल,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर येथे होत आहे. या महोत्सवात जिल्हावासियांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आज जिल्हाधिकारी तथा वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय समिती 2024 चे अध्यक्ष आस्तिककुमार पाण्डेय यांनी पत्रकार परिषदेत केले.

वेरुळ अजिंठा महोत्सवाचे आयोजन वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय समिती 2024 तर्फे करण्यात येत आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेस राज्य आयुक्त, लोकसेवा हक्क आयोग, पुणे दिलीप शिंदे,जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजन समिती आस्तिककुमार पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त तथा सहअध्यक्ष, वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव समीती जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संतोष झगडे आदी उपस्थित होते.

पर्यटन विभागाचे विजय जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, पर्यटन वाढीसाठी जागतिक स्तरावर छत्रपती संभाजीनगर जिल्हयाची ओळख प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालय सातत्याने प्रयत्न करते. विविध सेमीनार, परिषदा इ. चे आयोजन करुन अधिकाधिक पर्यटक येतील यासाठी प्रयत्न करते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने 1985 पासुन वेरुळ येथील कैलास लेणी समोरील जागेमध्ये जगविख्यात वेरूळ महोत्सव आयोजित करण्याची सुरूवात केली होती. सदर महोत्सवाचे रूपांतर 2002 पासुन वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात करण्यात आले. सदर महोत्सव जिल्हा प्रशासन, संयोजन समीती व पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यामाने करण्यात येतो.

प्रतिवर्षी प्रमाणे सन 2016 साली वेरूळ – अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मागच्या काही काळात विविध कारणामुळे हा महोत्सव होऊ शकला नव्हता. याच वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2023 मध्ये 7 वर्षानंतर अजिंठा- वेरूळ महोत्सव 2023 घेण्यात आला. त्याच प्रमाणे या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये 2,3 व 4 फेब्रुवारी 2024 या कालावधी मध्ये महोत्सव घेण्याचे निश्चित केले आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले की, वेरूळ -अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवा निमित्त पर्यटनाला चालना देण्याची व भारतीय अभिजात कला,नृत्य,साहित्य-संस्कृती यांच्या प्रचाराची मोठी संधी मिळाली आहे. या वर्षी दि. 2,3 व 4 फेब्रुवारी 2024 रोजी सोनेरी महाल येथे जागतिक दर्जाच्या सुप्रसिध्द कलाकारांमार्फत शास्त्रीय व उपशास्रीय, गायन, वादन व शास्त्रीय नृत्य इ. सादर केले जाणार आहे. सदर महोत्सवामध्ये श्रीमती संध्या पुरेचा व चमु, श्रीमती अनुराधा पाल व चमु, श्री राहुल देशपांडे, प्रियंका बर्वे, श्री अमान व अयान, श्री कैलाश खेर तसेच वैदेही परशूरामी, उर्मिला कानेटकर- कोठारी, श्रेया घोषाल व इतर कलाकार कला सादर करणार आहेत.

शनिवारी होणार उद्घाटन !

पूर्वरंग हा वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची नांदी असलेला पूर्वरंग कार्यक्रमाने महोत्सवाला सुरुवात होईल. याचे उद्घाटन शनिवारी दि. 20 रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री – रेल्वे, कोळसा व खाण रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री वित्त डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून रोहयो व फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री संदीपान भुमरे हे अध्यक्षस्थानी असतील. अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे सह अध्यक्ष असतील. प्रमुख पाहुणे विरोधी पक्ष नेता विधान परिषद अंबादास दानवे तसेच खा. इम्तियाज जलील, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, आ.हरिभाऊ बागडे, आ. संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, आ. प्रशांत बंब, आ. उदयसिंग राजपूत, आ. रमेश बोरनारे यांचीही उपस्थिती असेल. या कार्यक्रमासाठी राज्य आयुक्त, लोकसेवा हक्क आयोग, पुणे दिलीप शिंदे यांची विशेष उपस्थित असेल.

पूर्वरंग उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजन समिती आस्तिककुमार पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त तथा सहअध्यक्ष, वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव समीती जी. श्रीकांत यांनी केले.

पूर्वरंग ने होईल महोत्सवाची सुरुवात

वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची घोषणा करणारा पूर्वरंग कार्यक्रमाचे आयोजन यानिमित्त करण्यात आले असून 20 व 21 जानेवारी 2024 शनिवार व रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम होत आहे. संत एकनाथ रंगमंदिर येथे होत असलेल्या या कार्यक्रमात विविध कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. त्यात शनिवार 20 रोजी सायं वा. उदघाटन सोहळा, सांय 7 ते 07.40 “अनुभूती” कथ्थक नृत्य श्रीमती निधी प्रभु व सहकारी सादर करतील, सायं 7.40 ते 8.20 वा. “महाराष्ट्राची लोकगाणी” शाहीर रामानंद उगले,रात्री 8.30 ते 10.00 वा.”लोकोत्सव” प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे सह लावणी सम्राज्ञी रेश्मा परितेकर, प्रमिला लोदगेकर व ढोलकी सम्राट पाडुंरंग घोटकर,कृष्णा मुसळे.रविवार दिनांक 21 रोजी सांय 06.45 वा. तबला वादन सई बारबोटे, सायं 7 ते 7.30 वा. सतार वादर डॉ. स्विकार कटटी, सायं 7.30 ते 10 वा. अविनाश विश्वजीत लाईव्ह इन कॉन्सर्ट सोबत रोहित राऊत, मधुरा कुंभार, दिप्ती भागवत व रवींद्र खोमणे.

महोत्सवानिमित्त पूरक कार्यक्रमांची रेलचेल

वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवानिमित्त यंदा शहरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये गायन वादन सादरीकरण यांचा समावेश करण्यात आला आहे. ‘पूर्वरंग’ कार्यक्रमानंतर हे कार्यक्रम होतील. यामध्ये दि.23 रोजी कॅनाट प्लेस येथे दि. 25 क्रांती चौकात तसेच दि. 28 रोजी छावणी येथे लोककलांचे सादरीकरण होईल. त्यात मंगळवार दि. 23 रोजी सांय.06.00 ते 10.00 वा. खयाल ए बंदिश एम 4फ्युजन रॉक बँड विथ सुफी सागर म्हात्रे, कैवल्य केजकर, महेश बधे,चंद्रकांत उनावने च ओंकार इंगावले,स्थळ:- कॅनाट प्लेस सिडको, गुरूवार दि.25 रोजी सांय 06.00 वा. पर्यटनाची जागर ज्योत प्रजाकसत्ताक दिन पूर्वसंध्या व पर्यटन दिनानिमित्त विशेष आयोजन उपस्थिती प्रख्यात अभिनेत्री जुई गडकरी स्थळ:- क्रांती चौक (झांशीची राणी पुतळा), रविवार 28 रोजी सांय 6 ते 10 देश मेरा रंगीला, देशभक्ती – हिंदी मराठी गीते-नृत्य, सुत्रसंचालन:- दिप्ती भागवत (अभिनेत्री), आर जे प्रेषित रुद्रवार, नीता पाणसरे व किरण देशपांडे स्थळ:- छावणी (कॅन्टान्मेंट परिसर)

वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव हा दिनांक 2 फेब्रुवारी 2024 ते 4 फेब्रुवारी 2024 रोजी सोनेरी महाल,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर येथे होत आहे. शुक्रवार दि.2 फेब्रुवारी सायं 7.00 ते 8.00 वा. डॉ. संध्या पुरेचा व चमु यांचे भरतनाट्यम् नृत्य, रात्री 8.00 ते 9.00 वा. अनुराधा पाल व चमु यांचे वादन, रात्री 9.00 ते 11.00 राहूल देशपांडे व प्रियंका बर्वे यांचे शास्रीय/ उपशास्त्रीय गायन. शनिवार दि.3 फेब्रुवारी सायं 7.00 ते 8.00 वा. श्री. अमान व अयान यांचे सरोद वादन,रात्री 8.00 ते 10.00 वा. कैलाश खेर व चमू यांचे सुफी सादरीकरण. शनिवार दि. 3 फेब्रुवारी सांय 7.00 ते 7.45 वा. श्रीमती वैदेही परशुरामी व उर्मीला कानेटकर- कोठारी यांचे कथ्थक, रात्री 8.00 ते 10.30 वा. श्रीमती श्रेया घोषाल व चमु यांचे सादरीकरण.

महोत्सव पश्चात उत्तररंग हा कार्यक्रम दि. 10 फेब्रुवारी रोजी संत एकनाथ रंगमंदिर येथे आयोजित करण्यात येणार आहे. त्यात सायं 7.00 ते 9.30 वा. पं. विजय घाटे यांचे ताल दिंडी व ममता जोशी यांचा सुफीचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
सत्यप्रभा न्यूज

Previous Post

सव्वा किलोमीटर लांबीचा हानिकारक मांजा जप्त ! छत्रपती संभाजीनगर शहरातील ७३ दुकानांची कसून तपासणी !!

Next Post

रिक्षाच्या संपामुळे विद्यार्थ्यांसह महिला व वृद्धांचे मोठे हाल ! छत्रपती संभाजीनगरमध्ये स्मार्ट बस खचाखच भरून धावल्या !!

Next Post

रिक्षाच्या संपामुळे विद्यार्थ्यांसह महिला व वृद्धांचे मोठे हाल ! छत्रपती संभाजीनगरमध्ये स्मार्ट बस खचाखच भरून धावल्या !!

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    image editor output image 510237900 1782571113481

    भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणी

    27 June 2026
    image editor output image 533325925 1782570472729

    चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

    27 June 2026

    Recent News

    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    image editor output image 510237900 1782571113481

    भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणी

    27 June 2026
    image editor output image 533325925 1782570472729

    चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

    27 June 2026

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज