संबंधित गुत्तेदाराच्या कामाची गुण नियंत्रकाद्वारे तपासणी करून कारवाई करा…
हिमायतनगर प्रतिनिधी | तालुक्यातील मौजे एकंबा येथे सुरू असलेल्या डांबरीकरण रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करून सबंधित गुत्तेदारांकडून शासनाच्या डोळ्यात धूळ फेक करण्याचे काम सुरू असल्याचे समजताच ह्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या गोर सेनेचे तालुकाप्रमुख प्रमोद राठोड यांनी संबंधित रस्त्याची पाहणी केली असता तिथे इस्टिमेटला बगल देऊन एकदम निकृष्ट दर्जाचे काम होत होते रस्त्याचे खोद काम न करताच डांबर अंथरुण्याचे काम सुरू होते त्यामुळे गोर सेनेच्या अध्यक्षाने हा रस्ता खोऱ्याने उखरून दाखवत ह्या कामाची गुणवत्ता सर्व जनतेसमोर आणून दाखवल्याचा व्हिडिओ सध्या हिमायतनगर तालुक्यातील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात गाजत आहे त्यामुळे संबंधित गुत्तेदाराच्या कामाची गुण नियंत्रकाद्वारे तपासणी करून त्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
वरिष्ठांच्या कारवाईकडे जनतेचे लक्ष ! हिमायतनगर तालुक्यात संबंधित गुत्तदाराचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या वारंवार तोंडी व काही लेखी तक्रारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात येऊन सुद्धा अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई झाल्याचे उघड झाले नाही त्यामुळे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेवर संशय व्यक्त केला जात आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा येथील रस्त्याची अत्यंत दैनिय अवस्था झाल्याने येथील नागरिकांना पावसाळ्यात हा त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे त्यांनी शासन दरबारी संताप व्यक्त केला त्यामुळे एकंबा ते कोठा तांडा येथील रस्त्यास डांबरीकरण करण्याची मंजुरी मिळाली या रस्त्याचे काम एका शासकीय गुत्तेदाराच्या मार्फत सुरू करण्यात आले होते पण ह्या गुप्तेदाराने गावातील सरपंच उपसरपंच व काही अधिकाऱ्यांना हाताची धरून इस्टिमेटला बगल देत थातूरमातूर पद्धतीने एकदम निकृष्ट दर्जाचे काम करत येथील नागरिकांच्या व शासनाच्या डोळ्यात धूळपेर करत हे काम उरकून शासनाचा लाखो रुपयांचा निधी आपल्या घशात घालण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता तेव्हाच हिमायतनगर तालुक्याचे गोर सेना तालुका अध्यक्ष प्रमोद राठोड यांनी या रस्त्याची पाहणी करत कुठल्याही प्रकारचे खोदकाम न करता जशाच तसा निकृष्ट दर्जाचा डांबर ह्या रस्त्यावर अंथरून हे काम करणाऱ्या गुत्तेदाराच्या रोडचे त्यांनी खोऱ्याने खोदकाम करून ह्या रस्त्याच्या कामाचा काळा चिट्ठा सर्व जनतेसमोर आणल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून गुण नियंत्रण विभागामार्फत तपासणी करण्याची आग्रही भूमिका गोरसेना तालुकाप्रमुख यांनी केली व संबंधित निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मौजे एकबा व कोठा तांडा येथील ग्रामस्थांनी केली आहे…