प्रखर बाना, निर्भीड वृत्ती प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरा- वर अल्पकालावधीत राजकीय क्षेत्रात आपला दबदवा निर्माण करणारे हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू नांदेड जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख मा नागेश पाटील आष्टीकर यांचा जन्म एका सधन राजकीय कुटुंबात दिनांक २७ जुलै १९७२ रोजी आष्टी या खेडेगावात झाला त्यांचे पूर्ण नाव नागेश बाबुराव पाटील शिंदे बालपणापासूनच निडर वागने निर्भीड वृत्ती खोडकरपणा जोपासत त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण झाले महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी शहरातून पूर्ण करीत एम. कॉम पदवीचे शिक्षण पूर्ण केल.

नागेश पाटील आष्टीकर यांना बालपणापासूनच त्यांचे वडील स्वर्गीय आमदार बापुराव पाटील आष्टीकर यांच्याकडून राजकारणाचा बाळकडू मिळत होता त्यांच्या सहवासात समाजातील विविध घटकातील वादविवादाचे न्याय निवाड्याचे अनेक प्रसंग त्यांनी कशा पद्धतीने हाताळले न्यायनिवाडा करण्याचे काम कशा पद्धतीने केले जायचे हे प्रसंग त्यांनी खूप जवळून बघितले दीनदुबळ्या जनतेच्या हालअपेष्टा डोळ्यांनी बघत त्यांच्यावरील विदारक परिस्थितीचा सामना करण्याकरिता वेळोवेळी तरुण वयात त्यांनी समाजातील उपेक्षित घटकांची सेवा करण्याकरिता स्वतःला झोकून दिले समाज सेवेचे कंगन हाती बांधून घराण्याचा राजकीय वारसा पुढे चालवण्यासाठी गावच्या राजकारणापासून त्यांनी आपली राजकीय वाटचाल सुरुवात केली गाव गाड्याचे कारभार पाहण्यासाठी सन २००० या वर्षात आष्टी ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता काबीज करून त्यांची सरपंच पदी वर्णी लागली त्यानंतर त्यांनी विकासाचे ध्येय उराशी बाळगून शेतकऱ्यांच्या हितासाठी सन २००० मध्ये सेवा सहकारी सोसायटी आष्टी च्या चेअरमन पदी त्यांची वर्णी लागली तेव्हा या काळात प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांची कामे केली नागेश पाटील आष्टीकर हे एक लढव्या शिवसैनिक आल्याने शिवसेनेच्या हिताचे ठराव त्यांनी घेत हदगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कास्तकर यांचा विकास साधण्यासाठी अविरत प्रयत्न केल्याने या कामाची पावती म्हणून सन २००४ ते २००९ या कार्यकाळासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हदगाव च्या सभापती पदावर त्यांची निवड झाल्याने नागेश पाटील यांनी पुढील काळात शेतकऱ्यांच्या विकासाबरोबरच कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास साधला राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे संचालक पदी त्यांची निवड झाली.
तर २००९ या वर्षात मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी च्या संचालकपदी सुद्धा त्यांची निवड झाली होती सन २०१३ या काळात शिवसेनेचे संघटन मजबूत करण्याकरिता हदगाव तालुका शिवसेनाप्रमुख पदी त्यांनी काम केले. त्यानंतर विकासाची गंगा हदगाव हिमायतनगर मतदार संघात प्रारंभ केली सन २०१४ ते २०१९ या कार्यकाळात त्यांनी आमदार, जिल्हा नियोजन समितीवर, जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत त्यांची नियुक्ती झाली. व स.२०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये आपल्याच सहकाऱ्यांच्या बंडखोरीमुळे त्यांना प्रभावाचे तोंड बघावे लागले त्या पराभवाला खचून न जाता त्यांनी आपली विकास कामे चालूच ठेवले त्याची फलनिष्पत्ती म्हणून नुकतीच त्यांची नदिड जिल्हा मध्यवर्ती बँकच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये झालेल्या राजकीय घडामोडी मध्ये शिवसेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ते मुंबई दरबारी परिचित झाले त्यानंतर त्यांची नांदेड जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख पदी निवड झाली त्याच बरोबर हिंगोली लोकसभेची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असल्याने ते हिंगोली लोकसभेचे भावी खासदार म्हणून सध्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात परिचित होत आहेत असे खंबीर, संयमी, निडर व्यक्तिमत्व असलेल्या आमच्या नेत्याला वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शिवमय भगव्या शुभेच्छा व आई तुळजा भवानी त्यांना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

⬛कोरोणा काळात उल्लेखनीय कामगिरी..

हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी कोव्हिड काळात सामाजिक बांधिलकी जपत सर्वत्र कडक लॉकडाऊन असताना सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता हातावर पोट असलेल्या लोकांना मदत करून त्यांना एन अडचणीच्या वेळी मदतीचा हात दिला व हिमायतनगर येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन स्वतः रुग्णांच्या आस्थापनाची चौकशी करत त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण भासू दिली नाही कोणाला व्हेंटिलेटर ची गरज भासल्यास त्याची तात्काळ व्यवस्था करत पर्यायी ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करून दिले आपल्या मतदारसंघातील गोरगरीब नागरिकांना कोरोना काळात अन्नधान्याची व संसार उपयोगी साहित्याची वाटप करत कोरोना दुतांचा त्यांनी सन्मान सुद्धा केला…
वृत्तसंकलन
नागेश परमेश्वर शिंदे,
मो.9175381600
हिमायतनगर