हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसापासून सतत होत असलेल्या अतिवृष्टीमध्ये अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेडले तर अनेक गावचे रस्ते पाण्याने खरडून गेले आहेत त्यातच तालुक्यातील मौजे पावनमारी येथील एका 65 वर्षीय राधाबाई जाधव या वृद्ध महिलेची अचानक छाती दुखत होती तिला तात्काळ डॉक्टरची गरज असल्यामुळे गावातील सुजाण नागरिकांनी चक्क त्या महिलेला खांद्यावर घेऊन 4 ते 5 कोलो मीटर पायपीट करून नंतर आपल्या मोटार सायकल वाहनाने 10 किमी प्रवास करून उपचारासाठी शहरातील दवाखान्यात दाखल केले असे विदारक चित्र दि 28 जुलै रोजी पहायला मिळाले त्यामुळे उपस्थित गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या बेजबाबदारपणा मुळेच पावनमारी गावाला स्वातंत्र्य काळापासून अद्याप पक्का रस्ता मिळाला नसल्याचा संताप व्यक्त केला आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने अनेक गावचा शहराशी संपर्क तुटत आहे तर काही ठिकाणचे रस्ते सुद्धा पाऊसाच्या पाण्याने खरडून गेल्याने नागरिकांना हिमायतनगर शहरात येण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे असेच एक विदारक चित्र तालुक्यातील मौजे पावनमारी ते खडकी येथे दि 28 जुलै रोजी पाहायला मिळाले पवनमारी या गावाला स्वातंत्र्य काळापासून अद्यापर्यंत पक्का रस्ता नसल्यामुळे येथील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात चिखल तुडवीत चार ते पाच किलोमीटरचा पायी प्रवास करत नंतर खडकी मार्गे शहराच्या ठिकाणी हॉस्पिटल साठी यावे लागते अनेक वेळेस तर गावातील महिलांना बाळाच्या प्रस्तुतीसाठी शहराच्या ठिकाणी रात्री बे रात्री घेऊन जाण्याची वेळ आली तेव्हा गावातील नागरिकांच्या मदतीने चक्क पाळणा करून त्यांना उपचारासाठी घेऊन जावे लागत आहे अशी वारंवार तक्रार लोकप्रतिनेकडे करून सुद्धा या भागातील आमदार , खासदार या लोकप्रतिनिधींनी या गावाला पक्का रस्ता दिला नाही त्यामुळे आज रोजी पावसामध्ये एका 65 वर्षीय राधाबाई जाधव या वृद्ध महिलेला चक्क खांद्यावर बसून चार ते पाच किलोमीटर पायपीट करत नंतर आपल्या मोटार सायकलने खडकी मार्गे हिमायतनगर शहरात उपचारासाठी घेऊन जाण्याची वेळ आली आहे त्यामुळे पावनमारी येथील नागरिकांनी मतदारसंघातील लोकप्रतिनिधीच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे यावेळी अनिल बळीराम जाधव,रोहन जाधव, रामेश्वर जाधव,मारोती दंतलवाड,साहेबराव जाधव या गावकऱ्यांनी आपल्या दुचाकी गाडीने त्या महिलेस हिमायतनगर येथील खाजगी दाखवण्यात उपचारासाठी घेऊन गेले त्यामुळे आता तरी येथील लोकप्रतिनिधींना जाग येईल का ? असा प्रश्न येथील नागरीकांना पडत आहे