हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचलित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय येथे 13 ऑगस्ट रोज रविवारी सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे याचा हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील सर्व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आव्हान बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले आहे..
शहरातील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या सर्व रोग निदान शिबिराचे उद्घाटन मा.ना.संजयभाऊ राठोड मृद व जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली लोकसभेचे कार्यसम्राट खासदार हेमंत भाऊ पाटील, शिवसेना उपनेते आनंदरावजी जाधव, कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर, नांदेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर सह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.हिमायतनगर शहर आणि तालुक्यातील नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व आरोग्य तपासण्या करता याव्या व असलेल्या आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात रक्तदाब, ब्लड शुगर, ताप, किडनीचे आजार, हृदयरोग, हर्निया, अंगावरील गाठी, कॅन्सर ,हृदयाला छिद्र असणे, मतिमंद, कान नाक घशाचे सर्व आजार, दमा, डोळ्यांचे विकार, अस्तीरोग, ह्रदयविकार, बालकांच्या विविध आजारांबाबत तपासण्या व उपचार केले जाणार आहेत. तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या आरोग्य शिबिरास उपस्थित राहून या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना माजी जिल्हाप्रमुख नांदेड बाबुराव कदम कोहळीकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
चौकट
या शिबिराची नाव नोंदणी दि 13 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत शिबिर स्थळावर करण्यात येणार आहेत त्यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी व भरती रुग्णांना सर्वसामान्य चाचण्या उदाहरणात एक्स-रे ,रक्त, लघवी सोनोग्राफी ह्या मोफत करून दिल्या जाणार आहेत जर का रुग्णांचा आजार महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आल्यास त्यांचा उपचार विनामूल्य करण्यात येईल असे सुद्धा बाबुराव कदम कोहळीकर यांनी सांगितले













