तुषार कांबळे | हदगाव प्रतिनिधी | हदगाव तालुक्यातील(Hadgaon News) मौजे कवाना व पंचक्रोशीतील पळसा बरडशेवाळा चिंचगव्हाण शिबदरा पिंपरखेड सर्वच गावामध्ये एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या थाटामाटा साजरा करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व सावित्रीबाई फुले विद्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले.
विद्यार्थ्यां उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी गावातील सरपंच ग्रामसेवक मॅडम उपसरपंच पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्ते गावातील प्रतिष्ठित नागरिक आजी माजी विद्यार्थी अंगणवाडी कर्मचारी पोस्ट ऑफिस कर्मचारी आरोग्य कर्मचारी सेवा सहकारी सोसायटीचे कर्मचारी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सावित्रीबाई फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षिका व पत्रकार बांधव उपस्थित होते.